Hardik Pandya | हार्दिक पांड्याच्या घरी पाळणा हलला, चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचने मुलाला जन्म दिला आहे.

Hardik Pandya | हार्दिक पांड्याच्या घरी पाळणा हलला, चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बाबा झाला आहे. हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचने मुलाला जन्म दिला आहे. हार्दिकने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोड बातमी दिली आहे (Hardik Pandhya And Natasa Stankovic Blessed With Baby Boy).

हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर याबाबत एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने एक फोटोही शेअर केला आहे. ‘आमच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं’, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं.

हार्दिक पांड्याने बाबा झाल्याचं सोशल मीडियावर सांगताच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. हार्दिकचे चाहते आणि टीम इंडियाच्या खेळाडूंनी त्याच्या आयुष्यातील या नव्या पाहुण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

हार्दिकला मुलगा झाल्याची माहिती मिळाल्यावर संघाचा कर्णधार विराट कोहलीने हार्दिक आणि नताशाला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘तुम्हा दोघांना शुभेच्छा’, अशी पोस्ट विराट कोहलीने केली.

फलंदाज केएल राहुल आणि श्रेयश अय्यरनेही हार्दिक आणि नताशाला शुभेच्छा दिल्या (Hardik Pandhya And Natasa Stankovic Blessed With Baby Boy).

हार्दिक पांड्याने वर्षाच्या सुरुवातीला अभिनेत्री नताशा स्टॅनकोविचसोबत अचानक साखरपुडा करुन चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये पारंपारिक पद्धतीने या दोघांनी लग्नही केलं (Hardik Pandhya And Natasa Stankovic Blessed With Baby Boy).

संबंधित बातम्या :

AB de Villiers | एबी डिव्हिलियर्स तिसऱ्यांदा बाबा होणार

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल क्लिन बोल्ड, भारतीय परंपरेनुसार साखरपुडा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *