युजवेंद्र चहलकडून प्रेयसीसोबत गोड सेल्फी शेअर, धनश्री वर्माचा खास अंदाजात रिप्लाय

फिरकीपटू युजवेंद्र चहलने त्याची होणारी बायको धनश्रीसोबतचा क्यूट सेल्फी सोशल मिडीयावर अपलोड केला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:08 PM, 1 Dec 2020

सिडनी : भारत विरुद्ध ऑस्ट्र्लियामधील (IND vs AUS 2020) पहिल्या दोन्ही वनडे सामन्यात भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) चमक दाखवता आली नाही. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चहलच्या बोलिंगवर तुफानी फटके खेळत मनमुराद धावा लुटल्या. चहल जरी बोलिंगमध्ये कमी पडला असला तरी त्याची गर्लफ्रेंड तसंच होणारी बायको धनश्रीसोबतचा (Dhanashri Verma) क्यूट सेल्फी सोशल मिडीयावर अपलोड करुन चहल चर्चेत आला आहे. (Yuzvendra Chahal Posted a Selfie With His Girlfriend Dhanashri Verma)

युजवेंद्र चहलने धनश्रीसोबत एक छानसा सेल्फी सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या फोटोला त्याने कुठलंही कॅप्शन दिलेलं नसलं तरी त्याने हार्टचं इमोजी टाकलेलं आहे. चहलने हा फोटो पोस्ट केल्यानंतर काही तासांत त्यावर धनश्रीने खास अंदाजात रिप्लाय दिला आहे. क्या सेल्फी हैं… असं म्हणत तिने या सेल्फीची प्रशंसा केली. नेटकऱ्यांना मात्र हा सेल्फी चांगलाच पसंत पडलाय. अनेक नेटकऱ्यांनी या सेल्फीवर लाईक्सचा पाऊस पाडलाय तर अनेकांनी या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yuzvendra Chahal (@yuzi_chahal23)

फिरकीपटू युजवेंद्र चहलने काही दिवसांपूर्वी आपल्या आयुष्यातील एका नव्या इनिंगला सुरुवात केली. युजवेंद्र चहलने त्याची मैत्रीण धनश्री वर्माशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुड्याचा सोहळाही पार पडला.चहलची जोडीदार धनश्री वर्मा मुंबईची रहिवासी आहे. चहल आणि धनश्री मागील अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

कोण आहे चहलची होणारी बायको धनश्री वर्मा

युजवेंद्र चहलची जोडीदार धनश्री वर्मा व्यवसायाने डेंटिस्ट, कोरिओग्राफर आणि यूट्यूबर आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने मोठा काळ एकमेकांसोबत घालवला आहे. त्यानंतरच त्यांनी साखरपुड्याचा निर्णय घेतला. ऑगस्ट महिन्यात त्यांचा साखरपुडा झालाय.

(Yuzvendra Chahal Posted a Selfie With His Girlfriend Dhanashri Verma)

संबंधित बातम्या

‘आपदा को अवसर में बदल डाला’, युजवेंद्र चहलच्या साखरपुड्यावर सेहवागसह चाहत्यांकडून मीम्सचा पाऊस