IND vs NZ : सूर्यकुमार यादवच्या नशिबाबद्दल सुनील गावस्कर यांचं स्पष्ट मत, त्याला…

IND vs NZ : न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या टी 20 सामन्यात त्याने 26 चेंडूत 57 धावा फटकावल्या. रायपूरच्या दुसऱ्या सामन्यात त्याने 37 चेंडूत 82 धावांची खेळी केली होती. मैदानावर सूर्यकुमार यादव न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पिसं काढतोय. मैदानावर येताच त्याच्या बॅटमधून चौकार, षटकारांचा पाऊस सुरु होतो.

IND vs NZ : सूर्यकुमार यादवच्या नशिबाबद्दल सुनील गावस्कर यांचं स्पष्ट मत, त्याला...
sunil Gavaskar-suryakumar yadav
| Updated on: Jan 27, 2026 | 10:44 AM

मागच्या वर्षभरापासून आऊट ऑफ फॉर्म असलेल्या सूर्यकुमार यादवला सूर गवसला आहे. न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या टी 20 मालिकेत त्याने सलग दोन अर्धशतकं झळकवली आहेत. अगदी मोक्याच्या क्षणी सूर्यकुमार यादवला त्याचा फॉर्म परत मिळाला आहे. कारण पुढच्या महिन्यात 7 फेब्रुवारीपासून टी20 वर्ल्ड कप सुरु होतोय. मागच्या काही दिवसांपासून सूर्यकुमार यादववर चहूबाजूंनी बरीच टीका सुरु होती. आता सूर्याला त्याच्या खेळातली अचूकता आणि आत्मविश्वास परत मिळाला आहे. वर्ल्ड कपच्या आधी अगदी मोक्याच्या क्षणी सूर्य कुमार यादव फॉर्ममध्ये परतल्याने क्रिकेट चाहत्यांनी सुद्धा सुटकेचा निश्वास सोडलाय. सूर्याच्या संघातील स्थानावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होतं. आता त्याला सूर गवसल्याने टीम मॅनेजमेंटची चिंता मिटली आहे. वर्ल्ड कप संपेपर्यंत त्याचा हा फॉर्म असाच कायम रहावा अशीच सर्वांची इच्छा आहे. टी 20 वर्ल्ड कपच जेतेपद कायम राखण्याचं टीम इंडियासमोर आव्हान आहे.

सूर्याचा हा खेळ पाहून लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. ते सूर्यकुमार यादवच कौतुक करताना थकत नाहीयत. मागच्यावर्षी सूर्याचा संघर्ष सुरु होता. प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवणार या इराद्यानेच सूर्याने नव्या वर्षाची सुरुवात केली आहे. “रायपूरमधल्या खेळीने त्याचा आत्मविश्वास उंचावला . रविवारी गुवहाटीच्या पीचवर तो जास्त सहजतेने खेळताना दिसला. ज्या आत्मविश्वासाची त्याला गरज होती, तो रायपूरच्या इनिंगने दिला. तो फॉर्ममध्ये नव्हता असं नाहीय, त्याच्या धावा कमी पडत होत्या” असं सुनील गावस्कर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाले.

किती सामन्यात एकही हाफ सेंच्युरी झळकवली नव्हती?

12 ऑक्टोंबर 2024 नंतर 23 इनिंगमध्ये सूर्यकुमार यादवने एकही हाफ सेंच्युरी झळकवली नाही. या काळात त्याने एकदाच 40 प्लस स्कोर केला. अन्य सामन्यात 30 च्या आत धावा होत्या. रायपूरमध्ये अखेर हा दुष्काळ संपला. पावरप्लेनंतर त्याने त्याच्या खेळाचा गेअर बदलला. सेट झाल्यानंतर त्याने न्यूझीलंडची गोलंदाजी फोडून काढली. सूर्या आणि इशान किशनच्या वादळी खेळीमुळे रायपूरमध्ये टीम इंडियाने 209 धावांचं लक्ष्य आरामात पार केलं.

तिथे त्याला संघर्ष करावा लागत नव्हता

“नेट्समध्ये तो चांगली फलंदाजी करत होता. तिथे त्याला संघर्ष करावा लागत नव्हता. तो मैदानात चारही बाजूला बॉल आरामात मारायचा. फक्त मॅचेसमध्ये त्याला यश मिळत नव्हतं. कधी कधी काही गोष्टींसाठी लकची गरज पडते. यावेळी त्याला लकची सुद्धा गरज नव्हती. अशा इनिंगची त्याला गरज होती” असं सुनील गावस्कर म्हणाले.