AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-US Tension : भारताचा जवळच मित्र असलेला मुस्लिम देश बनला इराणची ढाल, ट्रम्प यांच्या धमक्या ऐकूनही घेतला मोठा निर्णय

Iran-US Tension : मध्य पूर्वेमध्ये कधीही युद्ध भडकेल अशी स्थिती आहे. अमेरिकन नौदलाचा USS अब्राहम लिंकन कॅरियकर स्ट्राइक ग्रुप हिंद महासागरात पोहोचला आहे. या अशा कठीण काळात एक मुस्लिम देश इराणची ढाल बनला आहे. थेट अमेरिकेला ललकारण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.

Iran-US Tension : भारताचा जवळच मित्र असलेला मुस्लिम देश बनला इराणची ढाल, ट्रम्प यांच्या धमक्या ऐकूनही घेतला मोठा निर्णय
US-IRAN
| Updated on: Jan 27, 2026 | 11:40 AM
Share

इराण आणि अमेरिकेमध्ये तणाव सतत वाढत चालला आहे. या दरम्यान आखातामधील एक मुस्लिम देशाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अमेरिकेची गोची होऊ शकते. इराण विरुद्ध कुठल्याही सैन्य कारवाईसाठी आम्ही आमचं हवाई क्षेत्र, जमीन किंवा समुद्री भागाचा अमेरिकेला वापर करु देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सोमवारी या देशाने घेतली. सौदी अरेबियाचा कडवा स्पर्धक आणि भारताचा जवळचा मित्र संयुक्त अरब अमीरातने आपला निर्णय जाहीर केला आहे. आमची भूमिका तटस्थतेची राहील असं UAE ने स्पष्ट केलय. क्षेत्रात शांतता आणि स्थिरतेसाठी कटिबद्ध आहोत असही यूएईने म्हटलय. दुसऱ्याबाजूला इराणसोबत तणाव वाढलेला असताना अमेरिकेचा USS अब्राहम लिंकन कॅरियकर स्ट्राइक ग्रुप हिंद महासागरात सेंटकॉम समुद्री क्षेत्रात पोहोचला आहे.

इराणचे ड्रोन स्वार्म USS अब्राहम लिंकन आणि सोबत असलेल्या स्ट्राइक ग्रुपसाठी धोकादायक ठरु शकतात असा अमेरिकी ड्रोन एक्सपर्टने इशारा दिला आहे. USS अब्राहम लिंकन सध्या इराणविरुद्ध कुठल्याही संभाव्य कारवाईसाठी पूर्णपणे तयार नाहीय असं अमेरिकी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका इराणमधील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन आहे.

अमेरिकेची इराणला वॉर्निंग

इराणमध्ये मागच्या काही दिवसांपासून विरोध प्रदर्शन सुरु होतं. या प्रदर्शनादरम्यान अनेक लोकांचा मृत्यू झाला. अनेकांना ताब्यात घेतलं. इराणमध्ये आंदोलकांच्या सुरु असलेल्या हत्या सत्रानंतर अमेरिकेने इराणला वॉर्निंग दिली. त्यानंतर मागच्या आठवड्यात अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलाचा मोठा ताफा इराणच्या दिशेने कूच करत असल्याचं म्हटलं होतं. याचा वापर करण्याची आवश्यकता पडणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.

अमेरिका अजून का थांबलीय?

इराणमध्ये सध्या विरोध प्रदर्शनाचं सत्र सुरु आहे. मानवाधिकार संघटनेच्या दाव्यानुसार या आंदोलनादरम्यान इराणमध्ये आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेकडून इराणला सतत हल्ला करण्याची धमकी दिली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कतर, सौदी अरेबिया आणि ओमानने अमेरिकेला इराणवर हल्ला करण्यापासून रोखलं. रॉयटर्सच्या रिपोर्ट्नुसार या कूटनितीक प्रयत्नात इजिप्त सुद्धा सहभागी होता. इराणमधील पाकिस्तानी राजदूत रजा अमीरी मोगद्दम यांच्या हवाल्याने डॉन या पाकिस्तानी वर्तमानपत्राने म्हटलय की, अमेरिका हल्ला करणार नाही असं ट्रम्प यांनी तेहरानला सूचित केलय. त्यांना संयम बाळगायला सांगितलेला.

कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट.
पुन्हा परीक्षा पे चर्चा, भारतात किती विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग?
पुन्हा परीक्षा पे चर्चा, भारतात किती विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग?.
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख..
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख...
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?.
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.