AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WhatsApp : काय? आता व्हॉट्सॲपसाठीही मोजावे लागणार पैसे ? सब्सक्रिप्शन विकत घेतलं नाही तर…

WhatsApp Subscription : दैनंदिन आयुष्यात WhatsAppचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण WhatsApp वापरणं आता फ्री नसेल. ते वापरायचं असेल तर आता पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. काय आहे हे प्रकरण ? चला जाणून घेऊया.

WhatsApp : काय? आता व्हॉट्सॲपसाठीही मोजावे लागणार पैसे ? सब्सक्रिप्शन विकत घेतलं नाही तर...
WhatsApp वापरण्यासाठी आता भरावे लागणार पैसे ?Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jan 27, 2026 | 11:34 AM
Share

मोबाईल, स्मार्टफोन.. ज्याच्या हातात बघाव त्याचा हातात फोन यअसतोच. लहान असोत की मोठे, कोणालाही हा मोह चुकलेला नाही. आणि बरेच जण स्मार्टफोन सोबत स्मार्ट बनून सोशल मीडिया ॲप्सचाही सर्रास वापर करतात. त्याचलंच एक महत्वाचं, रोजच्या वापरातलं ॲप म्हणजे WhatsApp.. तुम्हीही रोजच्या आयुष्यात हे WhatsApp वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीही तितकीच महत्वाची आहे. WhatsApp बाबत एक मोठी आणि नवी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे WhatsApp वापरणं आता फ्री नसेल, ते फुकट वापरता येणार नाहीये.

मिळालेल्या माहितीनुसार, आता हे ॲप वापरण्यासाठी लवकरच पैसे भरावे लागू शकतात. कारण कंपनी सध्या सबस्क्रिप्शन मॉडेलवर काम करत आहे. गेल्या वर्षी, मेटाने व्हॉट्सॲपच्या स्टेटस आणि चॅनेल विभागात जाहिरातींची चाचणी सुरू केली, या निर्णयावर अनेकांकडून टीका झाली, परंतु टीकेला न जुमानता कंपनीने माघार घेण्याची कोणतीही चिन्हे दाखवलेली नाहीत. त्यामुळे आता हे ॲप वापरण्यासाठी पैसे भरले नाही तर काय होईल आणि पैसे भरले तर तुम्हाला कसा अनुभव मिळेल, हे सविस्तर जाणून घेऊया.

WhatsApp व्हर्जन 2.26.3.9 हता, या ॲपच्या कोडमध्ये काही नवीन स्ट्रिंग आढळल्या आहेत ज्या स्टेटस आणि चॅनेलवरून जाहिराती काढून टाकण्यासाठी डिझाइन केलेल्या सबस्क्रिप्शनबद्दल माहिती देतात. सध्या याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, कंपनी ही युजर्ससाठी जाहिरातमुक्त योजनेच्या कल्पनेवर काम करत आहे हे रिपोर्ट्सवरून स्पष्ट होतंय.

WhatsApp Ad Free Subscription : पैसे भरले तर कसा असेल अनुभव ?

त्यामुळे आता 1 गोष्ट तर सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आणि स्पष्ट आहे, ती म्हणजे WhatsApp वापरताना जाहिरातींचा मारा नको असेल तर तुम्हाला पैसे भरावे लागतील, पण जर तुम्ही पैसे भरले नाहीत तर तुम्हाला वारंवार जाहिरती बघाव्या लागू शकतात. पण जे लोकं पैसे देऊन सबस्क्रिप्शन खरेदी करतील त्यांना करणाऱ्यांना WhatsApp वर Ad Free अनुभव मिळेल.

मात्र या सबस्क्रिप्शनची किंमत किती असेल , त्यासाठी किती पैस भरावे लागतील हे अद्याप उघड झालेलं नाही. तसेच जाहिराती काढून टाकण्याव्यतिरिक्त, त्यात कोणती वैशिष्ट्ये समाविष्ट असतील आणि ती वापरकर्त्यांसाठी कधी उपलब्ध होईल? याचीही माहिती समोर आलेली नाही. मात्र मीडिया रिपोर्ट्सवरून हे स्पष्टपणे दिसून येतं की सबस्क्रिप्शन केवळ तुमच्या स्टेटस आणि चॅनेलवर प्रदर्शित होणाऱ्या जाहिरातींवर केंद्रित आहे. याचा अर्थ तुम्हाला या दोघांशिवाय इतर कुठेही जाहिराती दिसणार नाहीत.

कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट.
पुन्हा परीक्षा पे चर्चा, भारतात किती विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग?
पुन्हा परीक्षा पे चर्चा, भारतात किती विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग?.
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख..
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख...
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?.
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.