AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karisma Kapoor: वांद्र्याच्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये करिश्मा कपूरचा एक-एक फ्लॅट; प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा दावा

Karisma Kapoor: पैशात खेळते करिश्मा कपूर... वांद्र्याच्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये अभिनेत्रीचा एक - एक फ्लॅट! बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्याचा मोठा दावा..., सध्या संपत्तीमुळे करिश्मा कपूर तुफान चर्चेत...

Karisma Kapoor: वांद्र्याच्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये करिश्मा कपूरचा एक-एक फ्लॅट; प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा दावा
karisma kapoor
| Updated on: Jan 27, 2026 | 11:24 AM
Share

Karisma Kapoor: अभिनेत्री करिश्मा कपूर गेल्या काही वर्षांपासून झगमगत्या विश्वापासून दूर आहे. पण करिश्मा आता तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी तर खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. आता देखील करिश्मा तिच्या फ्लॅटमुळे चर्चेत आली आहे. वांद्रे येखील प्रत्येक बिल्डिंगमध्ये करिश्मा कपूर हिचा एक – एक फ्लॅट आहे… असा दावा अभिनेता अक्षय कुमार यांने एका शोमध्ये केला. सांगायचं झालं तर, अक्षय सध्या ‘सो व्हील ऑफ फॉर्चून’ शोच्या होस्टची भूमिका पार पाडत आहे. तर अभिनेत्याच्या शोमध्ये करिश्मा पाहुणी म्हणून उपस्थित राहलेली. यावेळीच अक्षय याने करिश्मा हिच्या वांद्रे येथील फ्लॅटबद्दल मोठं वक्तव्य केलं.

करिश्मा कपूर माझी पहिली हिरोईन – अक्षय कपूर

शो दरम्यान, अक्षय कुमार याने करिश्माचं कौतुक केलं. अभिनेता म्हणाला, ‘सर्वांना माहिती आहे की, करिश्मा माझी पहिली हिरोईन आहे. करिश्मासोबत मी पहिला सिनेमा केला… पहिलं गाणं केलं… मला करिश्माला म्हणायचं आहे की, तू प्रचंड सुंदर दिसतेस…’ यावर करिश्मा हिने अक्षय याचे आभार देखील मानले.

View this post on Instagram

A post shared by @sonytvofficial

त्यानंतर विनोदी अंदाजात अक्षय म्हणाला, ‘वांद्रे येथील प्रत्येक बिल्डिंगमध्ये करिश्माचा एक – एक फ्लॅट आहे. बिल्डिंग खाली बोर्ड असतो. त्यावर ती कधीच पूर्ण नाव लिहित नाही. के. कपूर असं लिहिते. शिवाय आईच्या नावावर देखील फ्लॅट आहे. बी. कपूर या नावाने देखील फ्लॅट आहेत… आता ते खार आणि सांताक्रुझ येथे देखील स्वतःची संपत्ती उभी करणार आहे. पण एक गोष्ट चांगली आहे. ते फक्त एकच फ्लॅट घेतात. दुसरे लोकांसाठी बाकी ठेवतात….’ अक्षय याच्या वक्तव्यानंतर प्रेक्षक देखील पोट धरुन हसू लागले.

1992 मध्ये प्रदर्शित झालेला अक्षय कुमार याचा पहिला सिनेमा

1992 मध्ये प्रदर्शित अक्षय कुमार याचा पहिला सिनेमा झालेला. सिनेमाची निर्मिता प्रमोद चक्रवर्ती यांनी केली होती. सिनेमात अक्षय आणि करिश्मा यांनी मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमात अक्षय याने आनंद के मल्होत्रा तर, करिश्मा हिने सपना सक्सेना या भूमिकेला न्याय दिलेला. सिनेमात अक्षय आणि करिश्मा यांच्यासोबत अनुपम खेर, लक्ष्मीकांत बेर्डे, तनुजा, दन धनोओ, राजीव वर्मा, विजू खोटे यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती.

कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट.
पुन्हा परीक्षा पे चर्चा, भारतात किती विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग?
पुन्हा परीक्षा पे चर्चा, भारतात किती विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग?.
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख..
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख...
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?.
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.