55 चौकार, 52 षटकार, 167 चेंडूत 585 धावा, भारतीय क्रिकेटरचा विक्रम

भारताच्या एक शाळेतील विद्यार्थ्याने क्रिकेटमध्ये अप्रतीम असे प्रदर्शन घडवत संपूर्ण देशाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.

55 चौकार, 52 षटकार, 167 चेंडूत 585 धावा, भारतीय क्रिकेटरचा विक्रम

नवी दिल्ली : भारताच्या एक शाळेतील विद्यार्थ्याने क्रिकेटमध्ये अप्रतीम असे प्रदर्शन घडवत संपूर्ण देशाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. गाझियाबाद येथील या विद्यार्थ्याने (Swastik chikara smashes world record in cricket) शहीद राम प्रसाद विस्मिल स्मृती क्रिकेट सामन्यात तब्बल 585 धावा केल्या. विशेष म्हणजे त्याने आपल्या खेळी दरम्यान 55 चौकार आणि 52 षटकार 167 चेंडूत केल्या आहेत. स्वास्तिक चिकारा (Swastik chikara smashes world record in cricket) असं या विद्यार्थ्याचे नाव आहे.

माही क्रिकेट अकादमीकडून गोरखपूरच्या ACE क्रिकेट अकादमीच्या विरोधात खेळताना स्वास्तिकने हा कारनामा केला. यावेळी माही अकदामीने ACE क्रिकेट अकादमीचा 355 धावांनी पराभव केला.

गाझीयाबादच्या दीवान क्रिकेट स्टेडिअयमध्ये हा सामना खेळवण्यात आला. पहिल्या भागीदारीत स्वास्तिकने प्रीतसोबत पहिल्या विकेटसाठी 527 धावांची भागीदारी केली. यामध्ये प्रीतने 48 धावा केल्या. तर स्वास्तिकने 167 चेंडूत 585 धावा करत तुफानी फलंदाजी केली.

या तुफानी खेळादरम्यान 55 चौकार आणि 52 षटकार त्याने ठोकत विरोधी संघाला घाम फोडला. स्वास्तिकच्या या तुफानी खेळामुळे संघाने 38.2 षटकात 704 धावांचा डोंगर रचला. ACE चा गोलंदाज सोनूने 77 धावांवर 4 विकेट घेतले. लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या ACE संघाने 40 षटकात 7 विकेट घेत 349 धाव बनवू शकली.

यापूर्वीही स्वास्तिक आपल्या तुफानी खेळीमुळे चर्चेत राहीला आहे. शालेय क्रिकेटमध्ये यापूर्वीही त्याने सर्वाधिक 356 धावा करत विक्रम रचला होता. आतापर्यंत त्याने 22 द्विशतक आणि 7 त्रिशतक केले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *