T20 World Cup: बुमराहनंतर स्टार भारतीय बॅट्समनची प्रकृती बिघडली; टीम इंडियाला मोठा फटका

T20 World Cup: टी 20 वर्ल्ड कप 2026 ची सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात टीम इंडिया यूएसविरुद्ध मैदानात उतरली... पण सामन्याच्या सुरुवातीलाच स्टार पेसर जसप्रीत बुमराह आजारी पडला... तर सामन्यादरम्यान देखील एक स्टार बॅट्समनची प्रकृती बिघडली...

T20 World Cup: बुमराहनंतर स्टार भारतीय बॅट्समनची प्रकृती बिघडली; टीम इंडियाला मोठा फटका
T20 World Cup
| Updated on: Feb 08, 2026 | 11:59 AM

T20 World Cup: टी 20 वर्ल्ड कप 2026 ची सुरुवात झाली आहे. यावेळी भारत या स्पर्धेचे आयोजन करत आहे. टीम इंडिया डिफेंडिंग चँपियन म्हणून मैदानात उतरत असून पुन्हा एकदा विजेतेपदाचा दावेदार मानला जात आहे. पण त्याआधी इंडियन टीमला मोठ्या संकटाचा सामना करावा लागला आहे. त्यांच्या खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत सतत संघर्ष करावा लागत आहे. काहींना दुखापतींचा सामना करावा लागत आहे, तर काहींना आजारांचा सामना करावा लागत आहे. हर्षित राणा, वॉशिंग्टन आणि जसप्रीत बुमराह यांच्यानंतर, तरुण सलामीवीर अभिषेक शर्माचाही या यादीत समावेश झाला आहे. जे अमेरिकेविरुद्ध खेळत असताना अचानक आजारी पडला.

शनिवारी भारतीय टीमने टी 20 वर्ल्ड कप 2026 मध्ये आपल्या अभियानाची सुरुवात केली. पहिल्या सामन्यात इंडियन टीमचा सामना अमेरिकेसोबत झाला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत 161 धावा केल्या. मात्र, अमेरिकेच्या डावादरम्यान, अभिषेकची तब्येत अचानक बिघडली. अमेरिकेच्या फलंदाजीच्या सुरुवातीला तो मैदानावर होता, त्यानंतर त्याला मैदानाबाहेर जावं लागलं… त्यानंतर अभिषेक इतर खेळाडूंसोबत दिसला नाही.

सागायचं झालं तर, सामन्यादरम्यान अभिषेकला कोणतीही दुखापत झाली नसल्याचं दिसून आलं, परंतु सामना संपल्यानंतर सत्य उघड झालं. कर्णधार सूर्यकुमार यादव याने याबद्दल सविस्तर माहिती दिली. ‘अभिषेक याची तब्यत बिघडली… ज्यामुळे तो मैदानावर दिसला नाही. बुमराह याला सामन्याच्या सुरुवातीलात ताप आहे आणि अभिषेक याची देखील प्रकृती बिघडली…’

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने अभिषेकच्या प्रकृतीबद्दल खुलासा केला. ओपनरच्या अचानक पोटात तिव्र वेदना होऊ लागल्या. ज्यामुळे त्याला मैदानातून बाहेर करण्यात आलं… अभिषेकचे महत्त्व लक्षात घेता, त्याला पुन्हा मैदानात उतरवण्यात आलं नाही. तर संजू सॅमसन, अभिषेत याच्या बदली क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात आला.

दरम्यान, सिराज याने दिलासा देणारी बातमी देखील सांगितली… पुढच्या सामन्यापर्यंत अभिषेक याची प्रकृती स्थिर होईल… आणि तो त्याचा जलवा मैदानात दाखवे. या विश्वचषकात अपेक्षेनुसार कामगिरी करता यावी म्हणून अभिषेक पुढील सामना खेळण्यास उत्सुक असेल… असं देखील सिराज म्हणाला.