T20 World Cup Hat-Trick : विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत या दोन गोलंदाजांनी हॅट्रीक केली

महेश घोलप, Tv9 मराठी

Updated on: Nov 04, 2022 | 3:26 PM

जोश लिटिल या खेळाडूने तीन विकेट घेतल्यापासून त्याची अधिक चर्चा सुरु आहे.

T20 World Cup Hat-Trick : विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत या दोन गोलंदाजांनी हॅट्रीक केली
T20 World Cup Hat-Trick
Image Credit source: twitter

मेलबर्न : विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup) सुरु झाल्यापासून मैदानातला महामुकाबला रोज पाहायला मिळत आहे. आतापर्यंत फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी अनेक रेकॉर्ड (Cricket Record) केले आहेत. विश्वचषक स्पर्धेत आज आर्यलॅंडच्या (Ire)खेळाडूने हॅट्रीक केली आहे. न्यूझिलंडसारख्या तगड्या टीम विरुद्ध आर्यलॅंडच्या खेळाडूने हॅट्रीक केल्याने त्याचं सर्वत्र कौतुक होतं आहे.

जोश लिटिल या खेळाडूने तीन विकेट घेतल्यापासून त्याची अधिक चर्चा सुरु आहे. न्यूझिलंडचा कर्णधार केन विलियमसन, मिचेल सेंटनर आणि जिमी निशान या खेळाडूंना जोश लिटिल याने बाद केले आहे.

युएसई टीमचे खेळाडू कार्तिक मय्यप्पन याने सुद्धा श्रीलंका टीमविरुद्ध मॅच असताना हॅट्रीक केली आहे. त्याने सुरुवातीच्या काळात हॅट्रीक केल्याने तो सुध्दा चर्चेत आला होता.

T20 विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारे गोलंदाज

1. ब्रेट ली- 2007 विश्वचषक: ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश

2.कर्टिस कॅम्फर – 2021 विश्वचषक: आयर्लंड विरुद्ध नेदरलँड

3.वानिंदू हसरंगा – 2021 विश्वचषक: श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका

4. कागिसो रबाडा – 2021 विश्वचषक: दक्षिण आफ्रिका वि. इंग्लंड

5.कार्तिक मयप्पन – 2022 विश्वचषक: UAE विरुद्ध श्रीलंका

हे सुद्धा वाचा

6.जोशुआ लिटल – 2022 विश्वचषक: आयर्लंड वि. न्यूझीलंड

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI