T20 World Cup Super-8 : पावसामुळे सुपर-8 मध्ये मॅचचा खेळखंडोबा झाला तर ? ICC चा नियम काय ?

T20 World Cup Super-8: टी20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर-8 राऊंडमधील पहिल्याच सामन्यावर पावसाचं सावच घोंगावत आहे. पावसामुळे जर सुपर-8चा सामना वाया गेला तर काय होईल, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. अशा मोठ्या सामन्यांसाठी आयसीसीचे नियम काय असतात ? जाणून घेऊया सविस्तर ..

T20 World Cup Super-8 :  पावसामुळे सुपर-8 मध्ये मॅचचा खेळखंडोबा झाला तर ? ICC चा नियम काय ?
T20 वर्ल्ड कप Super-8 सामने
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 21, 2026 | 10:16 AM

T20 World Cup Super-8 : टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत आता सुपर- 8 राऊंडमधील सामन्यांना सुरूवात होणार आहे. या राऊंडमध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, वेस्ट इंडीज, इंग्लंड, श्रीलंका , पाकिस्तान आणि न्युझीलंड या संघांचा प्रवेश झाला आहे. हे सर्व संघ दोन गटात विभागण्यात आले आहेत, त्यामध्ये प्रत्येक संघाचा एकमेकांशी सामना होईल आणि प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील. त्यामुळे, आता होणारा हर एक सामना हा प्रत्येक संघांसाठी महत्त्वाचा असेल. पण जर अशा परिस्थितीत एखादा सामना पावसामुळे वाया गेला तर?

पावसामुळे सुपर-8 मॅचमध्ये व्यत्यय आला तर ?

ग्रुप स्टेजप्रमाणेच सुपर 8 चे सामनेही भारत आणि श्रीलंकेत खेळवले जातील. कोलंबोमध्ये सततच्या पावसामुळे, सामना रद्द झाला तर काय होईल असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र, ग्रुप स्टेजप्रमाणेच सुपर 8 च्या सामन्यांसाठीही राखीव दिवस ठेवलेला नाही. आयसीसीच्या नियमांनुसार, टी20 सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांना किमान पाच षटके खेळावी लागतात. त्यामुळे, कोणत्याही परिस्थितीत सामना पूर्ण होईल याची खात्री करण्याचा अंपायर प्रयत्न करतील , त्यामुळे काहीतरी निकाल लागू शकेल.

मात्र जोरदार जर पावसामुळे एखाद्या मॅचमध्ये 5 षटकांचाही खेळ झाला नाही तर सामना रद्द केला जाईल. अशा परिस्थिती, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. सामन्यात कोणीही विजेता नसेल आणि नेट रन रेट व काहीही परिणाम होणार नाही. दोन्ही संघांना पॉइंट टेबलमध्ये समान गुण मिळतील, परंतु विजयाचा फायदा दोघांनाही होणार नाही.

1 टीमच्या प्रत्येकी 3 मॅचेस

सुपर 8स्टेजमध्ये आता प्रत्येक संघ तीन सामने खेळेल, ज्यामुळे प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरणार आहे. सुपर 8 मधील प्रत्येक सामना दोन गुणांचा असतो, त्यामुळे जर पावसामुळे सामना वाया गेला तर संघांना जिंकण्याची संधी गमवावी लागू शकते, ज्याच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत मोठा धक्का ठरू शकतो. ही परिस्थिती विशेषतः नेट रन रेटमध्ये पुढे किंवा मागे असलेल्या संघांसाठी हानिकारक ठरू शकते. या स्पर्धेच्या सुरुवातीला, झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड सामना पावसामुळे पूर्णपणे रद्द झाला होता, तिथे दोन्ही संघांना 1-1 गुण मिळाले होते, मात्र त्याचा सुपर 8 पात्रता क्वॉलिफिकेशनवर मोठा परिणाम झाला.