Virat Kohli | टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीकडून देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा, केलं ‘हे’ आवाहन

| Updated on: Nov 14, 2020 | 9:57 PM

विराटने ट्विटरवरुन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Virat Kohli | टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीकडून देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा, केलं हे आवाहन
Follow us on

सिडनी : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (Team India Tour Australia) सिडनीमध्ये दाखल झाली आहे. देशाभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात येत आहे. कोरोनामुळे यावेळेस साधेपणाने दिवाळी साजरी करावी, असं आवाहनही अनेक कलाकारांकडून करण्यात आलं आहे. दरम्यान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विराटने आपल्या ट्विटरहॅंडलवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून विराटने देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छांसह  विराटने एक आवाहनही केलं आहे. team india captain virat kohli wished a happy diwali He appealed not to blow up firecrackers

काय आवाहन केलंय?

“माझ्यावतीने तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या सर्वांना शांती व आनंद लाभो. दिवाळीनिमित्त पर्यावरणाचा विचार करावा. कृपया फटाके फोडू नका”, असं आवाहन विराटने देशवासीयांना केलं आहे.

टीम इंडियाचे खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होणार आहे. एकदिवसीय मालिकेला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे.

विराट पहिल्या कसोटीनंतर परतणार

एकदिवसीय आणि टी 20 मालिकेनंतर टीम इंडिया 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर विराट मायदेशी परतणार आहे. जानेवारी महिन्यात विराट बाबा होणार आहे. त्यामुळे विराट कसोटी मालिका अर्धवट सोडून भारतात येणार आहे. बीसीसीआयने विराटला पालक्तवाची रजा मंजूर केली आहे.

असा आहे टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक

एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी
दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी
तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल
दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी
तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

सिडनीमध्ये पोहचल्यानंतर टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. सर्व खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह आला. यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी नेट्समध्ये कसून सराव केला. तसेच काही खेळाडूंनी जीममध्ये घामही गाळला.

संबंधित बातम्या :

IND vs AUS : के एल राहुलचं प्रमोशन, टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची धुरा

India Tour Australia | आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाकडून संधी

INDIA TOUR AUSTRALIA | टीम इंडिया ऑस्ट्रेलियात दाखल, खेळाडूंची कोरोना चाचणी नेगेटिव्ह, नेट्समध्ये कसून सराव

team india captain virat kohli wished a happy diwali He appealed not to blow up firecrackers