Shikhar Dhawan | ‘गब्बर’ धवनने घेतला कोरोना लसीचा पहिला डोस, शिखरकडून ट्विटरवर फोटो शेअर

| Updated on: May 06, 2021 | 6:43 PM

शिखर धवनने (Shikhar Dhawan) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

Shikhar Dhawan | गब्बर धवनने घेतला कोरोना लसीचा पहिला डोस, शिखरकडून ट्विटरवर फोटो शेअर
शिखर धवन Shikhar Dhawan
Follow us on

नवी दिल्ली | टीम इंडियाचा (Team India) स्टार क्रिकेटपटू (Shikhar Dhawan) शिखर धवन. धवनला क्रिकेट विश्वात ‘गब्बर’ म्हणून ओळखलं जातं. शिखरने (गुरुवारी 6 मे) कोरोना लसीचा (Corona vaccine)पहिला डोस घेतला आहे. ट्विट करत धवनने याबाबतची माहिती दिली आहे. तसेच धवनने सर्व कोव्हीड यौद्धाचं आभार मानले आहेत. तसेच त्याने देशातील जनतेला आवाहन केलं आहे. धवन आयपीएलमध्ये (IPL) दिल्ली कॅपिट्ल्सकडून (Delhi Capitals) खेळतो. बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने आयपीएल स्पर्धा स्थगित करावी लागली. (Team India cricketer Shikhar Dhawan get the first dose of Corona vaccine)

शिखर धवनने केलेले ट्विट

ट्विटमध्ये काय म्हटलंय?

“मी लस घेतली आहे. सर्व कोव्हीड यौद्धांचा मी आभारी आहे. कृपया सर्वांनी लवकरात लवकर लस घ्यावी. कोरोनाला पराभूत करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव मार्ग आहे”, असं शिखरने ट्विटमध्ये म्हटलंय. भारतात 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात सुरुवात केली आहे.

दरम्यान या आधी 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्याची सुरुवात करण्यात आली होती. त्यावेळेस टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मार्च महिन्यात कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. शास्त्री यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली होती.

कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी शिखर मैदानात

दरम्यान काही दिवसांपूर्वी धवन कोरोना विरुद्धच्या लढ्यात मैदानात उतरला होता. त्याने या लढ्यासाठी लाखो रुपयांची मदत करणार असल्याची घोषणा केली होती. त्याने ट्विट करत याबाबतची माहिती दिली होती. धवनने ऑक्सीजन सिलेंडर आणि कनसंट्रेटर्स खरेदी करण्यासाठी एका सामाजिक संस्थेला 20 लाखांची मदत केली होती. तसेत आयपीएलमधून बक्षिस स्वरुपात मिळणारी रक्कमही कोरोनासाठी देणार असल्याचंही धवनने नमूद केलं होतं. सामन्यात शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला सामनावीर म्हणून 1 लाख रुपये देण्यात येतात.

धवनची आयपीएलच्या 14 व्या मोसमातील कामगिरी

कोरोनामुळे आयपीएलचा 14 वा मोसम स्थगित करावा लागला. तेव्हापर्यंत दिल्लीने 8 सामने खेळले. या 8 मॅचमध्ये धवनने 54.28 च्या सरासरी आणि 134.27 या स्ट्राईक रेटने 3 अर्धशतकांसह 380 धावा केल्या. 92 धावा ही त्याची या मोसमातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली.

संबंधित बातम्या :

Ravi Shastri | रवी शास्त्रींना कोरोना लस, नेटिझन्स म्हणतात आधी ‘डोस’ घेऊन आलात का?

(Team India cricketer Shikhar Dhawan get the first dose of Corona vaccine)