Rahul Dravid : राहुल द्रविडच्या मुलाची कमाल, Four-Six चा पाऊस पाडला, समोरच्या टीमची लावली वाट
Rahul Dravid : राहुल द्रविड यांचा मोठा मुलगा समित द्रविडने मागच्या एक-दीड वर्षात आपल्या प्रदर्शनाने सर्वांच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलय. समितची भारताच्या अंडर-19 टीममध्ये सुद्धा निवड झाली होती. आता राहुल द्रविड यांचा लहान मुलगा अनवय सुद्धा क्रिकेटच मैदान गाजवतोय.

टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि हेड कोच राहुल द्रविड यांची मुलं त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून क्रिकेट विश्वात स्वत:ची ओळख बनवत आहेत. राहुल द्रविड यांचा मोठा मुलगा समितने मागच्या काही महिन्यात वेगवेगळ्या टुर्नामेंटसमध्ये दमदार प्रदर्शन केलय. आता त्यांचा लहान मुलगा अनवय द्रविड सुद्धा आपले वडिल आणि मोठ्या भावाप्रमाणे क्रिकेटच्या मैदानात फलंदाजीने धाक निर्माण करतोय. अनवयने विजय मर्चेंट ट्रॉफीमध्ये कर्नाटककडून खेळताना दमदार शतक झळकावलं. टीमला आवश्यक 3 पॉइंट्स त्याने मिळवून दिले.
बीसीसीआयच्या अंडर-16 रेड बॉल टूर्नामेंट विजय मर्चेंट ट्रॉफी स्पर्धेत कर्नाटकचा सामना झारखंड विरुद्ध होता. आंध्र प्रदेशच्या मुलापाडु येथे हा सामना होता. तीन दिवसाचा हा सामना 11 डिसेंबरपासून सुरु झाला होता. झारखंडने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग करताना 387 धावा केल्या. ओपनर तौहीद शतकापासून वंचित राहिला. त्याने टीमकडून सर्वाधिक 98 रन्स केल्या. त्याच्याशिवाय लोअर ऑर्डरमध्ये मनमीत सागरने 72 धावा केल्या.
त्यानंतर राहुल द्रविडचा मुलगा अनवय आला
त्यानंतर कर्नाटकची फलंदाजी सुरु झाली. कर्नाटककडून ओपनर्सनी दमदार सलामी दिली. कर्नाटककडून आर्या गोडा आणि कॅप्टन ध्रुव कृष्णन यांनी शानदार शतक झळकावलं. त्यानंतर राहुल द्रविडचा मुलगा अनवय चौथ्या नंबरवर फलंदाजीसाठी आला. टीमला मिळालेल्या चांगल्या सुरुवातीचा अनवयने फायदा उचलला व एक चांगली इनिंग खेळला. अनवये शेवटच्या दिवसाचा खेळ पूर्ण होण्याआधी शानदार शतक झळकावलं. त्याने 153 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. यात 10 फोर आणि 2 सिक्स आहेत.
संघाच्या यशामध्ये योगदान
ओपनर्सची शतकं आणि अनवच्या चांगल्या इनिंगच्या बळावर कर्नाटकने 4 विकेट गमावून 441 धावा केल्या. झारखंडवर 54 धावांची आघाडी घेतली. मॅच ड्रॉ झाली. पण पहिल्या इनिंगमध्ये मिळालेल्या आघाडीच्या बळावर कर्नाटकला 3 पॉइंट्स मिळाले. झारखंडला फक्त एक पॉइंटवर समाधान मानावं लागलं. अनवयने वडिला राहुल द्रविड यांच्याप्रमाणे दीर्घकाळ खेळपट्टीवर उभ राहून संघासाठी एक महत्त्वाची भूमिका बजावली. संघाच्या यशामध्ये योगदान दिलं.
समित द्रविड सुद्धा भारताच्या अंडर-19 टीममध्ये
अनवयच्या आधी राहुल द्रविड यांचा मोठा मुलगा समितने सुद्धा आपली ओळख बनवली आहे. त्याला काही महिन्यांपूर्वीच भारताच्या अंडर-19 टीममध्ये स्थान मिळालं. त्याला ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 टीम विरुद्ध अनऑफिशियल टेस्ट मॅच खेळायची होती. दुखापतीमुळे तो हा सामना खेळू शकला नाही.
