AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautam Gambhir : पाकिस्तानला हरवताच गौतम गंभीरने इरफान पठाणवर साधला निशाणा, म्हणाला तू प्रामाणिक…

Gautam Gambhir : काल आशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तानमध्ये मॅच झाली. या सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर गौतम गंभीरने इरफान पठाणवर निशाणा साधला. गौतमने इरफानवर निशाणा का साधला?. अशी वेळ का आली? ते समजून घ्या.

Gautam Gambhir : पाकिस्तानला हरवताच गौतम गंभीरने इरफान पठाणवर साधला निशाणा, म्हणाला तू प्रामाणिक...
Gautam Gambhir Image Credit source: Gareth Copley/Getty Images
| Updated on: Sep 15, 2025 | 12:49 PM
Share

टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर हे आक्रमक स्वभावाचे आहेत. भारताकडून खेळताना मैदानावर त्यांचं हे आक्रमक रुप अनेकदा दिसून आलय. आताही हेड कोच असताना ड्रेसिंग रुममध्ये अनेकदा त्यांची आक्रमकता दिसून येते. संधी मिळताच गौतम गंभीर आपलं म्हणणं प्रभावीपणे मांडतात. दुबईमध्ये पाकिस्तानला हरवल्यानंतर त्यांचं हेच रुप पहायला मिळालय. टीम इंडियाच्या विजयानंतर गौतम गंभीर यांना काही क्षणांसाठी आशिया कपच्या ब्रॉडकास्ट चॅनल सोनी स्पोर्ट्स नेटवर्कमध्ये बोलवण्यात आलं. तिथे टीमच्या परफॉर्मन्सबद्दल चर्चा झाली. गौतम गंभीरने चर्चेच्यावेळी स्टुडिओमध्ये बसलेले गेस्ट इरफान पठाण यांच्यावर निशाणा साधला.

टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर यांनी इरफान पठाणला प्रामाणिकपणाच ज्ञान दिलं.गौतमने इरफानला नेहमी प्रामाणिक रहा असं सांगितलं. गौतम गंभीर म्हणाला की, “कुठल्याही फिल्डमध्ये इमानदारी आवश्यक असते. ड्रेसिंग रूममध्ये प्रामाणिक लोक असले, तर काम सोपं होतं” पुढे गंभीर म्हणाला की, “इमानदारी फक्त ड्रेसिंग रुममध्येच नाही, तर भारतीय क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रत्येक ठिकाणी हवी. मग, तो कॉमेंट्री बॉक्स असो किंवा स्टुडिओ”

‘तुम्ही फक्त ऑरेंजची ऑरेंजशी तुलना करु शकता’

गौतम गंभीर आपला मुद्दा अजून सोप्या शब्दात समजावताना म्हणाला की, “तुम्ही फक्त ऑरेंजची ऑरेंजशी तुलना करु शकता. सफरचंद आणि संत्र्याची तुलना होऊ शकत नाही” गंभीरच्या मते कॉमेंट्री करणं आणि तिथे आपलं म्हणण मांडणं सोपं आहे. पण आपल्याला हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे की, टीम आता ट्रांजिशनच्या फेसमध्ये आहे. तुम्हाला ते परिवर्तन पहावं लागेल. गंभीरच्या मते, टीमला बॅक करणं आवश्यक आहे. सध्या सपोर्ट स्टाफ ते चांगल्या पद्धतीने करतोय.

इरफान पठाणवर का साधला निशाणा?

गौतम गंभीरने यामध्ये कुठे इरफान पठाणच नाव घेतलं नाही. पण तिथून निघता-निघात जे बोलला, त्यावरुन हे स्पष्ट झालं की, हे सर्व इरफान पठाणसाठीच होतं. इरफान पठाणच नाव घेऊन त्याचे आभार मानले.त्याला प्रामाणिक रहा असं सुद्धा सांगितलं. इरफानने कॉमेंट्री करताना काही दुखावणारी वक्तव्य केली असावीत, हे सुद्धा गौतम गंभीरने असं बोलण्यामागे कारण असू शकतं.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.