Chhaava : दुबईत ‘छावा’ सिनेमा पाहिल्यानंतर गौतम गंभीर का ट्रोल होतोय ?

Chhaava : 'छावा' चित्रपट रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांना भरपूर आवडला आहे. बॉक्स ऑफिसच यशच चित्रपटाबद्दल सर्व काही सांगून जातय. गंभीरने हा चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्यानंतर तो फॅन्सच्या निशाण्यावर आला आहे.

Chhaava : दुबईत छावा सिनेमा पाहिल्यानंतर गौतम गंभीर का ट्रोल होतोय ?
gautam gambhir-Chhaava
| Updated on: Feb 19, 2025 | 7:56 AM

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आज म्हणजे 19 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. टीम इंडिया आपले सर्व सामने दुबईत खेळणार असून उद्या 20 फेब्रुवारीला टीम इंडियाचा पहिला सामना बांग्लादेश विरुद्ध आहे. 23 फेब्रुवारीला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध मॅच आहे. टीम इंडिया चार दिवस आधीच दुबईत पोहोचली आहे. खेळाडू नेट्समध्ये जोरदार सराव करतायत. टीमची ही तयारी सुरु असताना टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर फॅन्सच्या निशाण्यावर आले आहेत. दुबईत गौतम गंभीर यांनी अभिनेता विकी कौशलचा चर्चित चित्रपट ‘छावा’ पाहिला. त्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. या पोस्टने फॅन्सच लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर गौतम गंभीर यांना ट्रोल करण्यास सुरुवात झाली.

‘छावा’ चित्रपट रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट भरपूर आवडला आहे. बॉक्स ऑफिसच यशच चित्रपटाबद्दल सर्व काही सांगून जातय. म्हणून गौतम गंभीर यांनी दुबईत हा चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला. गौतम गंभीरने चित्रपट पाहून झाल्यावर सोशल मीडियावर एक पोस्ट केली. ‘छत्रपती संभाजी महाराज, मातृभूमि के प्रति समर्पण!.’ गंभीरने ही पोस्ट करताच तो फॅन्सच्या निशाण्यावर आला. एक चाहत्याने त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीवर लक्ष देण्याचा सल्ला दिला. दुसऱ्याने ‘चॅम्पियन्स ट्रॉफी हरवू नको, भाई’, तिसऱ्या युजरने ‘कोचिंगवर लक्ष दे, चित्रपट काय पाहतोस’ असं म्हटलं आहे.

ट्रोलिंगमध्ये काय म्हटलय?

भारतीय क्रिकेट चाहत्यांना असं वाटतय की, गौतम गंभीर आपल्या कामाकडे लक्ष देत नाहीय. या मोठ्या आयसीसी टुर्नामेंटकडे विशेष लक्ष देण्याऐवजी त्याचं लक्ष दुसरीकडे कुठे आहे, असं टीम इंडियाच्या फॅन्सला वाटतय. म्हणून गंभीरने पोस्ट केल्यानंतर त्याला ट्रोल केलं जातय. असं नाहीय की फक्त गंभीरला ट्रोलच केलं जातय, काही फॅन्सनी त्याचं चित्रपटाच समर्थन केल्याबद्दल कौतुक सुद्धा केलं आहे.


प्लानिंग करताना दिसला

सध्या गौतम गंभीरच सर्व लक्ष चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवर आहे. ही ट्रॉफी परत जिंकण्यासाठी तो मेहनत घेतोय. दुबईत दाखल झाल्यानंतर तो कॅप्टन रोहित शर्मासोबत प्लानिंग करताना दिसला. कोचिंग स्टाफ आणि टीमच्या सर्व खेळाडूंना एकत्र बोलवून त्यांच्याशी गंभीरने चर्चा केली. त्याशिवाय विराट कोहलीच्या नेट सेशनमध्ये त्याच्या पाठिमागे उभा राहून त्याच्या टेक्निकवर लक्ष देताना दिसला.