Ravi Shastri | रवी शास्त्रींना कोरोना लस, नेटिझन्स म्हणतात आधी ‘डोस’ घेऊन आलात का?

| Updated on: Mar 02, 2021 | 1:00 PM

रवी शास्त्री यांना अहमदाबादच्या अपोलो रुग्णालयात कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला (Ravi Shastri COVID-19 vaccine)

Ravi Shastri | रवी शास्त्रींना कोरोना लस, नेटिझन्स म्हणतात आधी डोस घेऊन आलात का?
रवी शास्त्री यांना कोरोना लसीचा पहिला डोस
Follow us on

अहमदाबाद : कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा एक मार्चपासून देशभर सुरु झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यासारख्या दिग्गज नेत्यांनी पहिल्या दिवशी लस टोचून घेतली. मंगळवारी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनीही कोरोना लस घेतली. (Team India Head Coach Ravi Shastri took first dose of COVID-19 vaccine)

रवी शास्त्रींकडून ट्विटरवरुन माहिती

रवी शास्त्री यांना अहमदाबादच्या अपोलो रुग्णालयात कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला. खुद्द शास्त्रींनीच याची माहिती ट्विटरवरुन दिली. शास्त्रज्ञ आणि रुग्णालयाच्या वैद्यकीय टीमचंही त्यांनी यावेळी कौतुक केलं.

‘कोव्हिड19 लसीचा पहिला डोस घेतला. महामारीच्या विरोधात भारताला सशक्त करण्यासाठी शास्त्रज्ञांचे आभार अपोलो रुग्णालयात कांताबेन आणि त्यांच्या टीममुळे मी खूपच प्रेरित झालो’ अशा भावना रवी शास्त्रींनी ट्विटरवर व्यक्त केल्या.

सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

कोणाकोणाला कोरोना लस

कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात सरकारी रुग्णालयात 60 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत मिळेल. 45 वर्षांवरील सहव्याधी (कोमॉर्बिडीटीज) असलेल्या नागरिकांनाही लस दिली जाणार आहे. ज्या व्यक्तींना सरकारी केंद्रांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी कोव्हिड लस घ्यायची असेल, त्यांना लसीचे 250 रुपये मोजावे लागतील.

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका

भारतीय संघाच्या सपोर्च स्टाफमधील अन्य सदस्यांनाही कोरोनाची लस मिळाली आहे का, हे अद्याप समजू शकले नाही. भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. चौथा आणि शेवटचा कसोटी सामना गुरुवारपासून अहमदाबादमध्ये खेळवला जाईल. या मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे.

शास्त्रींच्या प्रशिक्षणात टीम इंडियाची भरारी

58 वर्षीय रवी शास्त्री यांनी भारतीय संघाला नव्या उंचीवर नेले आहे. 2017 मध्ये शास्त्री यांची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली होती. त्याच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियन भूमीवर सलग दोनदा कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी झाला आहे. रवी शास्त्री हे 2014 ते 2016 या काळात टीम इंडियाचे संचालकही राहिले आहेत.

रवी शास्त्री यांची कारकीर्द

रवी शास्त्री यांनी भारतासाठी 80 कसोटी सामन्यांत 3,830 धावा केल्या आहेत, तर 151 बळी घेतले आहेत. कसोटी सामन्यात त्यांनी 11 शतके आणि 12 अर्धशतके ठोकली आहेत. रवी शास्त्रींनी 150 एकदिवसीय सामन्यात 3,108 धावा केल्या, तर 129 बळी घेतले. त्यांनी एकदिवसीय सामन्यात 4 शतके, तसेच 18 अर्धशतकेही केली.

संबंधित बातम्या :

Ravi Shastri | जेव्हा रवी शास्त्री 120 वर्षांचे झाले…

कसोटी सामना दुसऱ्याच दिवशी उरकला, शास्त्री सरांचा स्वत:च्या व्हायरल मीम्सवर भन्नाट रिप्लाय, म्हणाले..

(Team India Head Coach Ravi Shastri took first dose of COVID-19 vaccine)