Ravi Shastri | जेव्हा रवी शास्त्री 120 वर्षांचे झाले…

Ravi Shastri | जेव्हा रवी शास्त्री 120 वर्षांचे झाले...
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक (Ravi Shastri) रवी शास्त्री

रवी शास्त्री (Ravi Shastri) टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.

sanjay patil

|

Feb 06, 2021 | 12:15 PM

मुंबई : टीम इंडियाने (Team India)ऑस्ट्रेलियामध्ये हेड कोच रवी शास्त्रींच्या (Head Coach Ravi Shastri) प्रशिक्षणाखाली शानदार कामगिरी केली. टीम इंडियाने या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी 20 आणि कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली. टीम इंडियाच्या या कामगिरीमुळे  रवी शास्त्री यांचं कौतुक करण्यात आलं. दरम्यान आता पुन्हा एकदा शास्त्री चर्चेत आले आहेत. पण यावेळेस चर्चेत येण्याचं कारण जरा हटके आहे. (team india head coach Ravi Shastri age is 120 on Google)

नक्की प्रकरण काय?

गुगल कधी काय दाखवेल सांगता येत नाही. एका क्रिकेट चाहत्याने शास्त्रीचं वय जाणून घेण्यासाठी गुगल ravi shahstri age on Google) केलं. तर गुगलने शास्त्री हे 120 वर्षांचे असल्याचं सांगितलं. आताही गुगल करुन पाहिलं तरी 120 इतकं वय दाखवलं जात आहे. गुगलवर 27 May 1900 ही त्यांची जन्मतारीख दाखवण्यात येत आहे. आम्हीही गुगल करुन याची सत्यता पडताळली. तेव्हाही हे असचं दाखवण्यात आलं. विकीपीडियामध्ये शास्त्रींचं वय हे 120 सांगितलं जात आहे. यामुळेच गुगलही हेच वय दाखवत असल्याचं म्हटलं जात आहे.

शास्त्रींची खरी जन्मतारीख

शास्त्री हे 58 वर्षांचे आहेत. त्यांचा जन्म 27 मे 1962 रोजी मुंबईत झाला होता. त्यांनी इंडियाकडून 80 कसोटी आणि 150 एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांनी कसोटीमध्ये 11 शतक आणि 1 द्विशतकासह 3 हजार 806 धावा केल्या आहेत. तसेच बोलिगंनेही शानदार कामगिरी केली आहे. त्यांनी एकूण 125 डावांमध्ये 151 विकेट्स घेतल्या आहेत. तर वनडेमध्ये 3 हजार 108 धावा आणि 129 विकेट्स घेतल्या आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी समालोचकाची भूमिका बजावली. दरम्यान शास्त्री यांची 2019 मध्ये मुख्य प्रशिक्षकपदी फेरनियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया शानदार कामगिरी करत आहे.

शास्त्रींवर जोरदार टीका

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका खेळण्यात येत आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळण्यात येत आहे. या पहिल्या सामन्यात चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी देण्यात आली नाही. अनुभवी कुलदीपला वगळून टीम मॅनेजमेंटने नवख्या शाहबाज नदीमला संधी दिली. यामुळे नेटकरी रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीवर सडकून टीका करत आहेत.

संबंधित बातम्या :

India vs England, 1st Test, Day 2, LIVE Score : बेन स्टोक्सचे दमदार अर्धशतक

Video: टीम इंडियाला झोडपणाऱ्या रुटच्या मदतीला जेव्हा विराट धावला

India vs england 1st test | अनुभवी कुलदीपला वगळून शाहबाज नदीमला संधी, नेटकरी बीसीसीआय आणि विराटवर संतापले

(team india head coach Ravi Shastri age is 120 on Google)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें