India vs england 1st test | अनुभवी कुलदीपला वगळून शाहबाज नदीमला संधी, नेटकरी बीसीसीआय आणि विराटवर संतापले

India vs england 1st test | अनुभवी कुलदीपला वगळून शाहबाज नदीमला संधी, नेटकरी बीसीसीआय आणि विराटवर संतापले
कुलदीप यादव

कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) ऑस्ट्रेलिया विरोधातील कसोटी मालिकेतही खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

sanjay patil

|

Feb 05, 2021 | 2:25 PM

चेन्नई : कोरोना काळानंतर टीम इंडिया  भारतात  पहिल्यांदाच खेळतेय. चेन्नईतील एम ए चिदंबरम (Chennai) स्टेडियममध्ये टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs england 1st test) यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळण्यात येत आहे. या सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमध्ये चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) पुन्हा डच्चू देण्यात आला. कुलदीपला वगळून नवख्या शहबाज नदीमला संधी देण्यात आली. अशा प्रकारे कुलदीपला पुन्हा एकदा डावलण्यात आले. इंग्लंड विरुद्ध चायनामॅन बोलरला संधी मिळेल, अशी शक्यता होती. पण ऐनवेळेस दुखापतग्रस्त अक्षर पटेलच्या जागी कुलदीपऐवजी शहबाद नदीमला संधी देण्यात आली. यामुळे सोशल मीडियावर कुलदीपच्या समर्थनार्थ ट्विट केले जात आहे. तसेच निवड समिती आणि कर्णधार विराट कोहलीवर संताप व्यक्त केला जात आहे. (india vs england 1st test match kuldeep yadav not getting place in playing xi  netizens trolled bcci and virat kohli )

जेव्हा आपण पात्र असूनही संधी मिळत नाही, तेव्हा फार त्रास होतो, अशा आशयाचं ट्विट एका युझरने केलं आहे. तसेच हा कुलदीपवर अत्याचार केला जातआहे, असंही एक ट्विट निवड समितीला उद्देशून केलं गेलं आहे. कुलदीपला वगळल्याने नेटीझन्स टीम मॅनेजमेंट आणि कॅप्टन विराट कोहलीवर सडकून टीका करत आहेत.

मोहम्मद कॅफचं ट्विट

या सर्व प्रकरणावरुन टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने ट्विट करत कुलदीपला धीर न सोडण्याचा सल्ला दिला आहे. 2 वर्षांपूर्वी कुलदीप टीम इंडियासाठी  प्रथम पसंतीचा खेळाडू होता.  मात्र आता त्याला संधी मिळत नाहीये. संघात स्थान मिळवण्यासाठी  तो झगडतोय.   कुलदीप मजबूत रहा, असा सल्ला कैफने  दिला आहे.

ऑस्ट्रेलिया विरोधातही निराशा

कुलदीपला ऑस्ट्रेलिया विरोधातील बॉर्डर गावसकर मालिकेतील 4 सामन्यांमध्येही संधी मिळाली नाही. या कसोटी मालिकेत अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. मात्र यानंतरही टीम मॅनेजमेंटने कुलदीपला संधी दिली नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकूण 5 युवा खेळाडूंनी पदार्पण केलं. यामध्ये शुबमन गिल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, थंगारासू नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंचा समावेश होता.

कोण आहे शहबाज नदीम?

कुलदीपला वगळून अक्षरच्या जागी शहबाज नदीमला संधी देण्यात आली. शहबाजची ही दुसरीच कसोटी आहे. शहाबाजने 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पण केलं होतं. या सामन्यात त्याने 4 विकेट्स घेतल्या होत्या. नदीमने117 फर्स्ट क्लास मॅचमध्ये एकूण 443 विकेट्स घेतल्या आहेत.

संबंधित बातम्या :

India vs england 1st test Day 1 LIVE : डोमिनिक सिबलेचे झुंजार अर्धशतक

India vs england 1st test | टीम इंडिया विरुद्ध मैदानात उतरताच इंग्लंडच्या जो रुटची ऐतिहासिक कामगिरी

India vs england 1st Test | पहिल्या टेस्टआधीच टीम इंडियाला मोठा धक्का, फिरकीपटू दुखापतग्रस्त

(india vs england 1st test match kuldeep yadav not getting place in playing xi  netizens trolled bcci and virat kohli )

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें