India vs england 1st Test Day 1 HighLights | जो रुटचे शानदार शतक, डोमिनिक सिब्लीची दमदार खेळी, पहिल्या दिवसावर इंग्लंडचे वर्चस्व

| Updated on: Feb 05, 2021 | 6:52 PM

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England 1st Test) यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम ( MA Chidambaram Stadium, Chennai) स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे.

India vs england 1st Test Day 1 HighLights | जो रुटचे शानदार शतक, डोमिनिक सिब्लीची दमदार खेळी, पहिल्या दिवसावर इंग्लंडचे वर्चस्व
विराट कोहली आणि जो रुट

चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील यांच्यातील पहिल्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. या पहिल्या दिवसावर इंग्लंडचं वर्चस्व राहिलं. इंग्लंडने दिवसखेर 89.3 षटकांमध्ये 3 विकेट्स गमावून 263 धावा केल्या. यामध्ये कर्णधार जो रुटने शानदार कामगिरी केली. रुटने आपल्या 100 व्या कसोटीमध्ये शानदार शतक लगावले. तर डोमिनिक सिब्लीने 87 धावांची खेळी केली. तर सलामीवीर रॉरी ब्रन्सने 33 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला तेव्हा जो रुट 128 धावांवर नाबाद होता. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहने 2 तर रवीचंद्रन अश्विनने 1 विकेट घेतला.  (india vs england 2021 1st test day 1 live cricket score updates online in marathi at m a chidambaram stadium chennai) लाईव्ह स्कोअरकार्ड

Key Events

रुटचं शंभराव्या कसोटीत शतक

इंग्लंडचा कर्णधार जो रुटने आपल्या 100 व्या सामन्यात शानदार शतक लगावले आहेत. रुटच्या कसोटी कारकिर्दीतील हे 20 वं शतक ठरलं आहे. इंग्लंडचा संघ अडचणीत असताना निर्णायक क्षणी त्याने डोमिनिक सिबलेसह महत्वपूर्ण भागीदारी केली.

रुटची डोमिनिक सिबलेसोबत शतकी भागीदारी

कर्णधार जो रुट आणि डोमिनिक सिबले या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. इंग्लंडची 2 बाद 63 अशी स्थिती झाली होती.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 05 Feb 2021 06:41 PM (IST)

    जो रुटची शानदार नाबाद खेळी

    पहिल्या दिवसखेर  जो रुटच्या नाबाद 128 धावा

  • 05 Feb 2021 05:56 PM (IST)

    जो रुटचे शानदार शतक

    जो रुटचे शानदार शतक, डोमिनिक सिब्लीची दमदार खेळी, पहिल्या दिवसावर इंग्लंडचे वर्चस्व

  • 05 Feb 2021 05:49 PM (IST)

    पहिल्या दिवसावर इंग्लंडचं वर्चस्व

    इंग्लंडने पहिल्या दिवसखेर 3 विकेट्स गमावून 263 धावा केल्या आहेत.  इंग्लंडकडून कर्णधार जो रुटने दिवसखेर नाबाद 128  धावा केल्या. तर  डोमिनिक सिब्लीने 87 धावांची खेळी केली. तर सलामीवीर रॉरी ब्रन्सने 33 धावा केल्या.  टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहने 2  तर अश्विनने 1 विकेट घेतला.

  • 05 Feb 2021 04:11 PM (IST)

    कर्णधार जो रुटचे शानदार शतक

    इंग्लंडचा कर्णधार जो रुटने आपल्या 100 व्या सामन्यात शानदार शतक लगावले आहेत. रुटच्या कसोटी कारकिर्दीतील हे 20 वं शतक ठरलं आहे. इंग्लंडचा संघ अडचणीत असताना निर्णायक क्षणी त्याने डोमिनिक सिबलेसह महत्वपूर्ण भागीदारी केली.

  • 05 Feb 2021 03:37 PM (IST)

    कर्णधार जो रुट आणि डोमिनिक सिबलेची शतकी भागीदारी

    कर्णधार जो रुट आणि डोमिनिक सिबले या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. इंग्लंडची 2 बाद 63 अशी स्थिती झाली होती. यानंतर या दोघांनी इंग्लंडचा डाव सावरला. या शतकी भागीदारीदरम्यान दोघांनी अर्धशतक लगावलं. टीम इंडियाच्या गोलंदाजांना विकेटसाठी संघर्ष करावा लागत आहे.

  • 05 Feb 2021 02:48 PM (IST)

    कर्णधार जो रुटचे शानदार अर्धशतक

    इंग्लंडचा कर्णधार जो रुटने शानदार अर्धशतक लगावलं आहे. जो रुटचा कसोटी कारकिर्दीतील 100 वा सामना आहे. यामुळे रुटच्या चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची  अपेक्षा असणार आहे. तसेच रुट आणि डोमिनिक सिबले ही जोडी शतकी भागीदारीच्या दिशेने आगेकूच करत आहे. त्यामुळे ही जोडी तोडण्याचे आव्हान टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर आहे.

  • 05 Feb 2021 02:33 PM (IST)

    दुसऱ्या सत्रावर इंग्लंडचं वर्चस्व

    दुसऱ्या सत्रावर इंग्लंडने वर्चस्व मिळवलं आहे. इंग्लंडने दुसऱ्या सत्रात एकही विकेट गमावली नाही.  चहापानापर्यंत जो रुट आणि डोमिनिक सिबले या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी केली. चहापानापर्यंत इंग्लंडने 2 विकेट गमावून 140 धावा केल्या. जो रुट 45 धावांवर नाबाद खेळत आहे. तर सिबले 53 धावांवर आहे.

    दुसऱ्या सत्रापर्यंत इंग्लंडचा स्कोअर 

    140-2 (57 Overs)

    जो रुट- 45* (100)

    डोमिनिक सिबले- 53* (186)
  • 05 Feb 2021 01:51 PM (IST)

    डोमिनिक सिबलेची अर्धशतकी खेळी

    इंग्लंडचा सलामीवीर डोमिनिक सिबलेने झुंजार अर्धशतकी खेळी केली आहे. तसेच डोमिनिक आणि जो रुट या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 50 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आहे.

  • 05 Feb 2021 01:27 PM (IST)

    इंग्लंडच्या 100 धावा पूर्ण

    इंग्लंडने 100 धावा पूर्ण केल्या आहेत. सलामीवीर डॉमिनिक सिबले मैदानात सेट झाला आहे. तर कर्णधार जो रुटला चांगली सुरुवात मिळाली आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर ही जोडी फोडण्याचे आव्हान असणार आहे.

  • 05 Feb 2021 12:58 PM (IST)

    जो रुट आणि डोमिनिक सिबलेने इंग्लंडचा डाव सावरला

    रुट आणि डोमिनिक सिबलेने इंग्लंडचा डाव सावरला आहे. पहिल्या सत्राच्या शेवटी इंग्लंडने लागोपाठ 2 विकेट्स गमावल्या होत्या. मात्र लंच ब्रेकनंतर या जोडीने इंग्लंडला स्थिरता दिली आहे. इंग्लंडने 37 ओव्हरपर्यंत  2  विकेट्स गमावून 81 धावा केल्या आहेत.

  • 05 Feb 2021 12:41 PM (IST)

    रुट विरुद्ध अश्विन

    इंग्लंडचा कर्णधार जो रुट आणि फिरकीपटू आर अश्विन यांच्या दोघांमध्ये चांगलीच झुंज पाहायला मिळणार आहे.

  • 05 Feb 2021 12:30 PM (IST)

    दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात

    लंचनंतर दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आहे. इंग्लंडकडून डोमनिक सिबले आणि जो रुट ही जोडी मैदानात खेळत आहे .

  • 05 Feb 2021 12:03 PM (IST)

    पहिल्या सत्रापर्यंत इंग्लंडच्या 2 बाद 67 धावा

    इंग्लंडने पहिल्या दिवसातील पहिल्या सत्रापर्यंत 2 विकेट्स गमावून 67 धावा केल्या आहेत. रोरी बर्न्स (Rory Burns) आणि डॉम सिबली (Dom Sibley) या जोडीने आश्वासक सुरुवात मिळवून दिली. दोघांनी 63 धावांची सलामी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पहिल्या सत्राच्या शेवटच्या काही ओव्हर्स शिल्लक असताना दमदार कमबॅक करत इंग्लंडला 2 धक्के दिले. रवीचंद्रन अश्विनने बर्न्सला 33 धावांवर आऊट केलं. तर जसप्रीत बुमराहने डॅनियल लॉरेन्सला शून्यावर बाद केलं.

    इंग्लंड | 67-2 (27 Overs)

    डोमनिक सिबली - 26* (96) जो रुट -4*(5)

  • 05 Feb 2021 11:31 AM (IST)

    इंग्लंडला दुसरा धक्का

    बर्न्स पाठोपाठ इंग्लंडने दुसरा विकेट गमावला आहे. यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहने डॅनियल लॉरेन्सला एलबीडबल्यू आऊट केलं.  लॉरेन्सला  भोपळाही फोडता आला नाही. लॉरेन्स आऊट झाल्याने इंग्लंडची 63-2 अशी स्थिती झाली आहे.

  • 05 Feb 2021 11:26 AM (IST)

    इंग्लंडला पहिला धक्का

     सलामी जोडी फोडण्यात फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनला यश आले आहे. अश्विनने रॉरी बर्न्सला विकेटकीपर रिषभ पंतच्या हाती कॅच आऊट  केलं. बर्न्सने 60 चेंडूत 2 चौकारांसह 33 धावा केल्या. 

  • 05 Feb 2021 11:06 AM (IST)

    इंग्लंडची आश्वासक सुरुवात

    इंग्लंडच्या सलामी जोडीने आश्वासक सुरुवात केली आहे. रॉरी बर्न्‍स आणि डॉमिनिक सिबली या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली आहे.

  • 05 Feb 2021 10:55 AM (IST)

    टीम इंडियाचे गोलंदाज विकेट्सच्या शोधात

    टीम इंडियाच्या गोलंदाजांना पहिल्या विकेट्साठी संघर्ष करावा लागतोय. सामन्यातील पहिल्या सत्रात आतापर्यंत एकूण 16  पेक्षा अधिक ओव्हर्सचा गेम झाला आहे. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांना पहिली विकेट मिळाली नाही.

  • 05 Feb 2021 10:28 AM (IST)

    इंग्लंडची सावध सुरुवात, पहिल्या 10 ओव्हरमध्ये बिनबाद 20 धावा

    इंग्लंडने पहिल्या डावात सावध सुरुवात केली आहे. रॉरी बर्न्‍स आणि डॉमिनिक सिबली या सलामी जोडीने पहिल्या 10 ओव्हरमध्ये 20 धावा केल्या आहेत. तर टीम इंडिया विकेटच्या शोधात आहे.

  • 05 Feb 2021 09:26 AM (IST)

    इंग्लंडचा कर्णधार जो रुटचा कसोटी कारकिर्दीतील 100 वा सामना

    असा आहे इंग्लंडचा संघ : रॉरी बर्न्‍स, डॉमिनिक सिबली, डेनियल लॉरेन्स, जो रूट, बेन स्‍टोक्‍स, ऑली पोप, जोस बटलर, डॉमिनिक बेस, जोफ्रा आर्चर, जॅक लीच आणि जेम्‍स अँडरसन.

  • 05 Feb 2021 09:22 AM (IST)

    संघात इशांत शर्माचं पुनरागमन, तर अक्षर पटेलच्या जागी शाहबाज नदीमला संधी

    टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि शाहबाज नदीम.

  • 05 Feb 2021 09:13 AM (IST)

    सामन्याआधी टीम इंडियाला धक्का, अक्षर पटेल दुखापतग्रस्त

    पहिल्या कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का लागला आहे. फिरकीपटू अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे अक्षरला पहिल्या कसोटीला मुकावे लागले आहे. अक्षरच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. अक्षरचं या मालिकेतील पहिल्या सामन्यातून कसोटी पदार्पण जवळपास ठरलं होतं. पण दुखापतीमुळे त्याला आणखी वाट पाहावी लागणार आहे.

  • 05 Feb 2021 09:05 AM (IST)

    इंग्लंडने टॉस जिंकला

    इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 05 Feb 2021 08:55 AM (IST)

    टॉसचा बॉस कोण?

    टॉससाठी आता काही मिनिटं बाकी आहेत. त्यामुळे टॉस कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

Published On - Feb 05,2021 6:41 PM

Follow us
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.