IND vs NZ : वैभव सूर्यवंशीला आज न्यूझीलंड विरुद्ध चांगली संधी होती, पण..नुसती हाइप बाकी काही नाही

IND vs NZ 2nd T20i : वैभव सूर्यवंशीवर टीम इंडियात अन्याय होतोय असं अनेकांना वाटतं. टॅलेंट असूनही त्याला मुद्दामून डावलतात असा काहींचा समज झाला आहे. पण प्रत्यक्षात संधी मिळाल्यानंतर तो कसा खेळतो त्याचा आजच्या मॅचमधील आकडा पाहा.

IND vs NZ : वैभव सूर्यवंशीला आज न्यूझीलंड विरुद्ध चांगली संधी होती, पण..नुसती हाइप बाकी काही नाही
Vaibhav Sooryavanshi
| Updated on: Oct 24, 2026 | 4:12 PM

टीम इंडियामधील सर्वात युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीने आज पुन्हा एकदा निराश केलं. न्यूझीलंड दौऱ्यात इशान किशनला दुखापत झाल्यामुळे वैभवसाठी प्लेइंग इलेवनचे दरवाजे उघडले होते. त्याला आज चांगली संधी होती. पण वैभवने निराश केलं. वैभव सूर्यवंशी टॅलेंटेड, प्रतिभावान खेळाडू आहे, त्यामुळे त्याला संधी द्या अशी नेहमीच चर्चा सुरु असते. वैभव सूर्यवंशीचा प्लेइंग इलेवनमध्ये समावेश करत नाहीत, त्यावेळी त्याच्यावर अन्याय होतोय अशी अनेकांची भावना असते. पण वास्तवात संधी दिल्यानंतर वैभव सूर्यवंशीकडून अपेक्षित प्रदर्शन होत नाहीय, हे सुद्धा तितकचं सत्य आहे. आज न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात संघाला गरज असताना वैभव सूर्यवंशी अवघ्या 4 धावा करुन पॅवेलियनमध्ये परतला.

वैभव सूर्यवंशीने 8 चेंडूत 4 धावा केल्या. स्मिथने त्याला मिचेल करवी कॅचआऊट केलं. वैभव सूर्यवंशीने मागच्यावर्षी आयपीएल मध्ये डेब्यू केला. तेव्हापासून तो चर्चेत आहे. यंदाच्या वर्षी आयपीएल सीजनमध्ये त्याने सर्वाधिक 776 धावा केल्या. तेव्हापासून त्याला टीममध्ये स्थान देण्याच्या मागणीने जोर धरला. आयर्लंड आणि इंग्लंड मधल्या टी20 सीरीजसाठी त्याचा टीममध्ये समावेश करण्यात आला. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात टीम इंडिया एकूण सात सामने खेळली. त्यात 3 सामन्यात त्याला संधी मिळाली. वैभवने फक्त 42 धावा केल्या.

Loading...

भारतातला हा स्टार फक्त देशी वाघ वाटू लागलाय

आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला फरक आता त्याच्या लक्षात आला असेल. पहिल्या चेंडूपासून गोलंदाजावर तुटून पडणाऱ्या वैभव सूर्यवंशीला परदेशातील खेळपट्ट्यांशी जुळवून घेण अजून जमलेलं नाही. पाटा खेळपट्टी आणि वेगवान, स्विंगला अनुकूल खेळपट्टी यामध्ये मोठा फरक असतो. वेगवान खेळपट्टीवर वैभवच्या कमकुवत बाजू उघडल्या पडल्या आहेत. भारतातला हा स्टार फक्त देशी वाघ वाटू लागलाय. कारण त्याला संधी मिळाल्यानंतरही महत्वाच्या सामन्यात प्रभाव पाडता येत नाही. आज अवघ्या 4 धावा करुन त्याने पॅवेलियनची वाट धरली.

आता पुढच्या सामन्यात त्याला संधी मिळेल की नाही हे सांगता येत नाही. आज अजून एक गोष्ट स्पष्ट झाली. वैभव सूर्यवंशी ओपनिंग करतो. पण टीम मॅनेजमेंटने त्याच्यासाठी म्हणून ओपनिंगची जोडी बदलली नाही. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनीच ओपनिंग केली. वैभवला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us