Champions Trophy 2025 : जिंकल्यानंतर टीम इंडियाने व्हाईट ब्लेझर का घातलं ? कारण कोणालाच माहीत नसेल..

IND vs NZ Champions Trophy Final : चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या प्रत्येक खेळाडूने पांढरं ब्लेझर परिधान केला होता. ही या स्पर्धेची परंपरा आहे. पण यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का?

Champions Trophy 2025 :  जिंकल्यानंतर टीम इंडियाने व्हाईट ब्लेझर का घातलं ? कारण कोणालाच माहीत नसेल..
टीम इंडिया
Image Credit source: X
| Updated on: Mar 10, 2025 | 12:37 PM

रविवारी रात्री झालेल्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करून भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाचे हे सातवे आयसीसी विजेतेपद आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने दोन वनडे आणि दोन टी-20 विश्वचषकानंतर तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. प्राईज सेरेमनीमध्ये संपूर्ण संघाला स्पेशल व्हाईट ब्लेझर घालण्यात आलं. मात्र आयसीसीच्या इतर कोणत्याही इव्हेंटमध्ये व्हाईट ब्लेजरची परंपरा नाहीये.,

मग फक्त आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येच विजेत्या संघावा पांढरं ब्लेझर का घालण्यात येतं ? चला जाणून घेऊया..

ICC चॅम्पियन्स ट्रॉफीची पहिली आवृत्ती 1998 मध्ये बांग्लादेशमध्ये आयोजित करण्यात आली होती. पण 2009 च्या दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आवृत्तीत प्रथमच आयकॉनिक पांढरं ब्लेझर सादर करण्यात आलं होतं, जो विजयी संघाच्या प्रत्येक सदस्याला आदर म्हणून घालण्यात येतं.

13 ऑगस्ट 2009 रोजी अनावरण केलेले हे जॅकेट मुंबईस्थित फॅशन डिझायनर बबिता एम यांनी तयार केले होते. ज्यांचे कलेक्शन अनेक हाय-प्रोफाइल आउटलेटमध्ये विकले गेले. जॅकेटमध्ये पोत आणि पट्ट्यांसह उच्च दर्जाची इटालियन लोकर आहे. पांढऱ्या रंगाच्या जॅकेटवर सोन्याची ब्रेडिंग आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा लोगो कापडावर सोनेरी बाह्यरेखा असलेली नक्षी आहे. पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी औपचारिक सूटचे अनावरण केले होते. हे जॅकेट हे वारशाचे प्रतीक आहे जे येणाऱ्या पिढीला प्रेरणा देते, असे त्यांनी आयोजकांच्या प्रमोशनल व्हिडीओमध्ये अधोरेखित केलं.

अजिंक्य ठरलेल्या टीम इंडियाचा फायनलमध्येही विजय

काल पार पडलेल्या फायनलमध्ये न्युझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतसमोर 252 धावांचे आव्हान ठेवले. कर्णधार रोहित शर्माच्या (76 धावा) अर्धशतकाच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव करून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकली. अंतिम सामन्यात 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 49 षटकात 6 विकेट गमावत 254 धावा करत विजय मिळवला.

श्रेयस अय्यरने 48 आणि शुभमन गिलने 31 धावा केल्या. अक्षर पटेलने 29 धावांचे योगदान दिले. केएल राहुलने नाबाद 34 आणि रवींद्र जडेजाने नाबाद 9 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर न्यूझीलंडने डॅरिल मिशेल (63 धावा) आणि मायकेल ब्रेसवेल (नाबाद 53) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर सात विकेट्स गमावून 251 धावा केल्या.