AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हैदराबादचा ‘हा’ फलंदाज सानिया मिर्झाचा काका, भारत सोडून पाकिस्तानला गेला, 9 व्या क्रमांकावर शतक झळकावलं!

उजव्या हाताचा फलंदाज आणि उजवा हाताचा मध्यम वेगवान गोलंदाज आसिफ इक्बाल आज त्यांचा वाढदिवस... आपण नजर टाकूया आसिफ इक्बाल यांच्या क्रिकेट कारकिर्दीवर...! (Tennis Star Sania Mirza Relation With Pakistani Player Asif Iqbal)

हैदराबादचा 'हा' फलंदाज सानिया मिर्झाचा काका, भारत सोडून पाकिस्तानला गेला, 9 व्या क्रमांकावर शतक झळकावलं!
सानिया मिर्झा
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Jun 06, 2021 | 7:51 AM
Share

मुंबई :  आज 6 जून… आजच्याच दिवशी हैदराबादमध्ये एका क्रिकेटपटूचा जन्म झाला. तो भारतातही देशांतर्गत क्रिकेट खेळला, पण त्यानंतर तो भारत सोडून पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी गेला. ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये नऊ क्रमांकावर उतरुन ऐतिहासिक शतक ठोकले. शिवाय हा क्रिकेटपटू भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार गुलाम मोहम्मद आणि भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाशीही संबंधित आहे. उजव्या हाताचा फलंदाज आणि उजवा हाताचा मध्यम वेगवान गोलंदाज आसिफ इक्बाल असं या खेळाडूचे नाव आहे. आज त्यांचा वाढदिवस… आपण नजर टाकूया आसिफ इक्बाल यांच्या क्रिकेट कारकिर्दीवर…! (Tennis Star Sania Mirza Relation With Pakistani Player Asif Iqbal)

आसिफ हैदराबाद, कराची, केंट, नॅशनल बँक ऑफ पाकिस्तान आणि पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सकडून क्रिकेट खेळले. हैदराबादमध्ये क्रिकेट शिकल्यानंतर ते 1961 मध्ये पाकिस्तानात स्थायिक झाले. तिथे त्याने गोलंदाजी सुरु केली. 1977 मध्ये आसिफ यांनी वर्ल्ड इलेव्हनच्या वर्ल्ड सिरीज क्रिकेटमध्ये भाग घेतला होता. आसिफ यांनी 1964-65 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कराची कसोटी सामन्यात पदार्पण केलं.

पाठीच्या सततच्या दुखण्यामुळे त्यांनी गोलंदाजीऐवजी फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आणि पाकिस्तान संघात त्यांच्या फलंदाजीचा क्रम वरचेवर टॉप ऑर्डरच्या दिशेने सरकू लागला. 1967 च्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 9 व्या क्रमांकावर बॅटिंगला येत त्यांनी पहिलं कसोटी शतक झळकावलं. आसिफ यांनी या ऐतिहासिक खेळीत 146 धावा केल्या. हा सामना ओव्हल येथे खेळला गेला.

आसिफ सानियाचे काका

आसिफ इक्बाल हे भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाचे काका आहेत. भारतीय संघाचे माजी कर्णधार गुलाम अहमद यांची सासू आणि सानिया मिर्झाच्या वडिलांची आई दोघीही बहिणी होत्या. आसिफ इक्बाल गुलाम अहमद यांचे भाचे आहेत.

440 मॅचमध्ये 45 शतकं, 23 हजार रन्स

आसिफ इक्बालने आपल्या कारकिर्दीत एकूण 58 कसोटी सामने खेळले, ज्यात त्यांनी 38.85 च्या सरासरीने 3575 धावा केल्या. यात 11 शतके आणि 12 अर्धशतकांचा समावेश होता. कसोटी क्रिकेटमधील त्यांची सर्वाधिक धावसंख्या 175 धावा होती. त्याचबरोबर 10 एकदिवसीय सामन्यात त्यांनी 55 च्या सरासरीने 330 धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्यांच्या नावावर 5 अर्धशतके आहेत. आसिफ यांनी 440 प्रथम श्रेणी सामन्यात 23329 धावा केल्या. यात त्यांनी 45 शतकंही ठोकली. यामध्ये 196 धावा ही त्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. लिस्ट ए सामन्यांमध्ये आसिफ यांनी 27.98 च्या सरासरीने 5989 धावा केल्या. यामध्ये 3 शतके आणि 33 अर्धशतके आहेत.

(Tennis Star Sania Mirza Relation With Pakistani Player Asif Iqbal)

हे ही वाचा :

सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लाराबद्दल ब्रेट लीचं आश्चर्यचकित करणारं मत, म्हणाला, ‘मला माहिती असायचं…’

WTC फायनलपूर्वी अजित आगरकरचा महत्त्वाचा सल्ला, पण विराट कोहलीला हा सल्ला अजिबात आवडणार नाही!

कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या सात वर्षानंतरही इंग्लंडमधील धोनीचा रेकॉर्ड जसाच्या तसा!

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी.

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका.

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका