WTC फायनलपूर्वी अजित आगरकरचा महत्त्वाचा सल्ला, पण विराट कोहलीला हा सल्ला अजिबात आवडणार नाही!

भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने (Ajit Agarkar) भारतीय कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) एक महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे पण कदाचित तो सल्ला विराट कोहलीला न पटणारा किंवा न आवडणारा आहे. 

WTC फायनलपूर्वी अजित आगरकरचा महत्त्वाचा सल्ला, पण विराट कोहलीला हा सल्ला अजिबात आवडणार नाही!
विराट कोहली आणि अजित आगरकर
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 6:35 AM

मुंबई : टीम इंडियाचे (Team India) सगळे खेळाडू इंग्लंडमध्ये (India Tour of England) पोहोचले आहेत. 2 जून रोजी मध्यरात्री भारतीय संघांच्या खेळाडूंनी इंग्लंडसाठी उड्डाण घेतलं. 3 जून रोजी संघ लंडनमध्ये पोहोचला. तिथून साऊथहॅम्प्टन… सध्या सगळे खेळाडू कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियम आणि अटींच्या अधिन राहून क्वारंटाईन आहेत. कधी एकदा क्वारंटाईन पिरियड संपतो आणि सराव सत्र सुरु होतं, याची वाट भारतीय खेळाडू पाहत आहे. एकंदरितच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची जशी उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे तशी ती खेळाडूंना देखील आहे. अशातच भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने (Ajit Agarkar) भारतीय कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) एक महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे पण कदाचित तो सल्ला विराट कोहलीला न पटणारा किंवा न आवडणारा आहे.  (World Test Championship India vs New Zealand Ajit Agarkar Suggest Virat kohli)

अजित आगरकरचा विराटला सल्ला

“अजित आगरकरने विराटला महत्त्वाचा सल्ला दिलाय तो संघातल्या बोलिंगबाबत…. साऊथहॅम्प्टनमधील परिस्थिती आणि पीचचा एकंदर विचार करता भारतीय संघाचे तीन प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा यांना खेळवायला हवं आणि त्यांच्या साथीनेच बोलिंगचं आक्रमण करायला हवं. शमी आणि बुमराह भारतीय संघाचे क्रमांक एकचे गोलंदाज आहेत. हे तीन खेळाडू विराटने निश्चितपणे खेळवायला हवे, जर सीमिंग विकेट असेल तर जरुर चौथा गोलंदाज खेळताना दिसेल”, असा महत्त्वपूर्ण सल्ला अजित आगरकर याने विराटला दिला.

आगरकरने विराटला दिलेला सल्ला का पसंत पडणार नाही?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा यांना खेळवायला हवं, असं म्हणताना अजित आगरकरने साहजिक विराटचा आवडता गोलंदाज मोहम्मद सिराजवर काट मारली आहे. विराटचा मोहम्मद सिराजवर खूप विश्वास आहे. सिराजने कोहलीचा विश्वास अनेक वेळा सार्थही करुन दाखवला आहे. भरीस भर म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिराजने अद्वितीय कामगिरी करुन कांगारुंना त्यांच्यात भूमीत आस्मान दाखवण्यात भारतीय संघाकडून मोलाचा वाटा राहिला. अशा परिस्थितीत आत्मविश्वास दुणावलेल्या सिराजला संघाबाहेर बसविण्यास विराट तयार नसेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे आगरकरने दिलेला सल्ला विराटला तितकासा आवडणार नाही.

अजित आगरकर आणखी काय म्हणाला?

“साऊथहॅम्प्टनमध्ये परिस्थिती नेमकी कशी असेल हे सध्या तरी सांगता येत नाही. परंतु इंग्लंडमध्ये ड्युक बॉलने गोलंदाजांना साहजिक मदत मिळते. जूनच्या मध्यात पीच कोरडं असेल याचा आपण विचारही करु शकत नाही”, असं आगरकर म्हणाला.

अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला, टीम इंडियाचा 72 तासांचा विशेष सिक्रेट प्लॅन

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या संघात इंग्लंडमध्ये 18 जून ते 22 जूनच्या दरम्यान खेळला जाईल. अंतिम सामन्यासाठीची तयारी टीम इंडिया (Inidan Cricket Team) बंद खोलीत करणार आहे. यासाठी संघाने एक ‘सिक्रेट प्लॅन’ तयार केला आहे. त्या प्लॅननुसार संपूर्ण टीम 72 तास बंद खोलीत आहे. न्यूझीलंडच्या खेळाडूंची सर्व रणनीती लक्षपूर्वक अभ्यासली जात आहे. प्रत्येक खेळाडूची खेळण्याची पद्धत महत्त्वाचे शॉट या साऱ्याचा अभ्यास यावेळी करण्यात येत आहे.

World Test Championship India vs New Zealand Ajit Agarkar Suggest Virat kohli

हे ही वाचा :

कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या सात वर्षानंतरही इंग्लंडमधील धोनीचा रेकॉर्ड जसाच्या तसा!

WTC फायनलचं मैदान कोण मारणार, भारत की न्यूझीलंड?, ब्रेट ली म्हणतो…

WTC Final पूर्वी टीम इंडियावर निर्बंध, साऊथहॅम्प्टनमध्ये खेळाडूंना एकमेकांना भेटण्यासही मज्जाव

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.