Tilak Varma : तिलक वर्माकडून त्याच्या आजारपणाबद्दल मोठा खुलासा, ग्लोव्हज कापून काढावे लागले, काय आहे रबडोमायोलिसिस आजार?

Tilak Varma : भारताच्या मधल्याफळीतील फलंदाज तिलक वर्माने गौरव कपूरच्या ब्रेकफास्ट विद चॅम्पियन्स शो मध्ये आयुष्याचं हे सत्य सांगितलं. तिलक वर्माने सांगितलं की, वर्ष 2022 मध्ये तो इंडिया ए कडून बांग्लादेश विरुद्ध सीरीज खेळत होता.

Tilak Varma : तिलक वर्माकडून त्याच्या आजारपणाबद्दल मोठा खुलासा, ग्लोव्हज कापून काढावे लागले, काय आहे रबडोमायोलिसिस आजार?
Tilak Verma
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 24, 2025 | 10:00 AM

अलिकडेच झालेल्या आशिया कप 2025 टुर्नामेंटच्या फायनलमध्ये तिलक वर्मा भारताच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने फायनलमध्ये पाकिस्तानच्या तोंडातून विजयाचा घास हिरावला. आशिया कपच्या फायनलमध्ये तिलक वर्मा नायक ठरला. पण तीन वर्षांपूर्वी आकाश अंबानी आणि जय शाह यांनी त्याचे प्राण वाचवले नसते, तर हे शक्य झालं नसतं. भारताच्या मधल्याफळीतील या फलंदाजाने गौरव कपूरच्या ब्रेकफास्ट विद चॅम्पियन्स शो मध्ये आयुष्याचं हे सत्य सांगितलं.

तिलक वर्माने सांगितलं की, वर्ष 2022 मध्ये तो इंडिया ए कडून बांग्लादेश विरुद्ध सीरीज खेळत होता. त्यावेळी फलंदाजी करताना त्याला रबडोमायोलिसिस आजाराची लागण झाली. हा एक जीवघेणा आजार आहे. या आजारात शरीरातील स्नायू तुटण्यास सुरुवात होते आणि रक्तात मायोग्लोबिन नावाचं रसायन जातं. त्यामुळे किडनी खराब होते.

हातातील ग्लोव्हज कापून काढावे लागले

तिलकने आपल्या आयुष्यातील त्या वाईट क्षणाबद्दल बोलताना म्हणाला की, “त्याची शतकाच्या दिशेने वाटचाल सुरु होती. त्याचवेळी अचानक त्याचे डोळे खेचले जातायत असं वाटू लागलं. त्याच्या बोटांनी काम करणं बंद केलं. शरीर दगडासारखं होतय असं त्याला वाटू लागलं. कारण शरीर आकडलं गेलं” तब्येत बिघडल्यामुळे त्याला रिटायर हर्ट होऊन मैदानातून परतावं लागलं. त्याने सांगितलं की, त्यावेळी हातातील ग्लोव्हज कापून काढावे लागले. कारण बोटं वळत नव्हती.

अजून थोडा उशिर केला असता, तर….

आकाश अंबानी आणि जय शाह यांच्या प्रयत्नामुळे त्या जीवघेण्या आजारातून मी बाहेर पडू शकलो असं तिलक वर्मा म्हणाला. त्याने दोघांचे आभार मानले. माझी तब्येत खराब झाल्याच समजताच आकाश अंबानी यांनी लगेच BCCI चे तत्कालिन सचिव जय शाह यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी माझी विचारपूस केली. त्यानंतर दोघांच्या प्रयत्नाने लगेच मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिलक वर्माने सांगितलं की, “डॉक्टर म्हणाले की, माझी कंडीशन इतकी सीरियस होती की, थोडा अजून उशीर केला असता तर जीव गेला असता”