Tokyo Paralympics 2020: भारतीय खेळाडूंचा टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये इतिहास, 19 पदकांची लयलूट, ‘या’ भारतीयांनी तिरंगा डौलात फडकवला!

टोक्यो पॅरालिम्पिक्स खेळांना 24 ऑगस्ट रोजी सुरुवात झाली होती. आज (5 सप्टेंबर) या खेळांचा शेवटचा दिवस असून भारताचे स्पर्धेतील सर्व सामने संपले आहेत

Tokyo Paralympics 2020: भारतीय खेळाडूंचा टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये इतिहास, 19 पदकांची लयलूट, 'या' भारतीयांनी तिरंगा डौलात फडकवला!
Tokyo Paralympics
Follow us
| Updated on: Sep 05, 2021 | 1:20 PM

Tokyo Paralympics 2020: टोक्यो ऑलिम्पिक 2020 (Tokyo Olympics 2020) स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत भारतीय खेळाडूंनी सात पदकं मिळवली. इतिहासातील ही सर्वाधिक पदकसंख्या होती. पण या कामगिरीप्रमाणेच  भारी कामगिरी भारतीय पॅरा एथलिट्सनी टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics 2020) केली आहे. भारताने 5 सुवर्णपदकं, 8 रौप्य पदकं आणि 6 कांस्यपदकांसह तब्बल 19 पदकं खिशात घातली आहेत. इतिहासातील भारताची ही सर्वाधिक पदकसंख्या आहे.

24 ऑगस्ट, 2021 रोजी सुरु झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धांचा आज (5 सप्टेंबर) शेवटचा दिवस. भारताचे सर्व खेळ संपले असून भारताने अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून स्पर्धेतील अप्रतिम कामगिरी सुरु ठेवली. आज शेवटच्या दिवशीही बॅडमिंटनमध्ये भारताने एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकत शेवट गोड केला. तर भारताच्या कोणत्या खेळाडूने कोणतं पदक जिंकलं पाहूया…

भारताचा गोल्डन पंच

भारतीय खेळाडूंनी यंदा पॅरालिम्पिकमध्ये एक, दोन नाहीतर तब्बल पाच सुवर्णपदकं मिळवली. भारताची पॅरालिम्पिक इतिहासातील ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. यामध्ये भारताने बॅडमिंटन खेळामध्ये दोन सुवर्णपदक पटकावली. ज्यात प्रमोद भगत आणि कृष्णा नागर यांनी सुवर्ण पदक मिळवलं. तर निशाणेबाजीतही भारताने दोन सुवर्णपदकं मिळवली. ज्यामध्ये  मनीष नरवालसह अवनी लेखराने सोनेरी कामगिरी करत पदक जिंकलं. तर पाचवं सुवर्णपदक हे भालाफेकमध्ये सुमित अंतिलने एक नवा जागतिक रेकॉर्ड सेट करत मिळवलं.

8 रौप्य पदकं मिळवत भारताची चंदेरी कामगिरी

सुवर्णपदकांपाठोपाठ भारताने 8 रौप्य पदकंही पटकावली. यामध्ये नेमबाज सिंहराज अधानाने पी4 मिश्रित 50 मीटर एअर पिस्टल प्रकारात, योगेश कठुनियाने थाळीफेकमध्ये, निशाद कुमारने T-47 उंच उडीत, प्रवीण कुमारने T-44 स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. उंच उडी टी-६३ प्रकारामध्ये मागील वेळी सुवर्णरपदक मिळवणाऱ्या मरियप्पन थंगावेलुने यंदा रौप्य मिळवलं. याशिवाय देवेंद्र झाझड़ियाने भालाफेक, सुहास यथिराज यांनी बॅडमिंटन आणि भाविना पटेलने टेबल टेनिसमध्ये रौप्य पदक पटकावलं.

भारताला सहा कांस्य पदकांची कमाई

भारतीय बॅडमिंटनपटूच्या अप्रतिम कामगिरीत SL3 वर्गात मनोज सरकारनेही योगदान देत कांस्य पदक मिळवलं. तसंच सुवर्णपदक मिळवणाऱ्या अवनी लेखराने महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं. तसंच रौप्य पदकासह सिंहराज अधानाने 10 मीटर एअर पिस्तूल फायनलमध्ये कांस्यपदक मिळवलं. तसंच तिरंदाजीत हरविंदर सिंगनेही भारताला पहिलं कांस्य पदक मिळवून दिलं. याशिवाय भालाफेकमध्ये सुंदर सिंह गुर्जरने आणि उंच उडीत शरद कुमारने एक-एक कांस्य पदक मिळवून दिलं.

हे ही वाचा – 

Tokyo Paralympics 2020: भारतासाठी सुवर्णमय सकाळ, बॅडमिंटनपटू कृष्णा नागरला सुवर्णपदक, भारताचं स्पर्धेतील 19 वं पदक

Tokyo Paralympics 2020: भारतीय नेमबाजांकडून पदकांची लयलूट, अवनीपाठोपाठ मनीषने पटकावलं सुवर्ण तर सिंहराज रौप्यपदकाचा मानकरी

(Indian para atheletes Won total 19 meadals including 5 gold medals at tokyo paralympics 2020)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.