Tokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचा कांस्य पदकासाठीचा सामना आज, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर सिंधूसमोर किमान कांस्य पदक मिळवण्याची संधी आहे. यासाठी तिला चीनच्या ही बिंगजियाओला नमवनं गरजेचं आहे.

Tokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचा कांस्य पदकासाठीचा सामना आज, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?
पीव्ही सिंधू

Tokyo Olympics 20-2021 : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने (PV Sindhu) चीनी ताइपेच्या खेळाडू विरुद्ध सेमीफायनलचा सामना गमावत सुवर्णपदकासह रौप्य पदक मिळवण्याची संधीही गमावली आहे. मात्र पदक मिळवण्याची आशा अजूनही कायम आहे. सिधू कांस्य पदक जिंकू शकते त्यासाठी तिला चीनच्या डावखुऱ्या बॅडमिंटनपटूला मात देणं गरजेचं आहे. ही खेळाडू जगात सध्या 9 व्या क्रमांकावर असून ही बिंगजियाओ (He Bingjiao) असं तिचं नाव आहे.

सिंधू आणि बिंगजियाओ यांच्यातील आतापर्यंतचे सामने पाहता दोघीही 15 वेळा आमने-सामने भिडल्या आहेत. ज्यामध्ये ही हिचं पारंड जड आहे. तिने 15 पैकी 9 सामने जिंकत वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. तर सिंधूला केवळ 6 सामन्यातच विजय मिळवता आला आहे.

सिंधु आणि बिंगजियाओ यांच्यातील कांस्य पदकाचा सामना कुठे होणार?

सिंधु आणि बिंगजियाओ यांच्यातील तिसऱ्या स्थानासाठी अर्थात कांस्य पदकासाठीचा सामना टोक्यो ओलिम्पिक व्हिलेजच्या कोर्ट नंबर 1 वर खेळवला जाईल.

सिंधु आणि बिंगजियाओ यांच्यातील सामना सुरु होण्याची भारतीय वेळ ?

सिंधु आणि बिंगजियाओ यांच्यातील सामना आज 1 ऑगस्ट रोजी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सायंकाळी 5 वाजता सुरु होईल.

सिंधु आणि बिंगजियाओ यांच्यातील सामना कधी आणि कसा पाहू शकता?

सिंधु आणि बिंगजियाओ यांच्यातील सामना ब्रॉडकास्टर चॅनल सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे.

सिंधु आणि बिंगजियाओ यांच्यातील सामना ऑनलाइन कसा पाहू शकता?

सिंधु आणि बिंगजियाओ यांच्यातील आजचा कांस्य पदकासाठीचा सामना ऑनलाइन मोबाईल अॅप सोनी लिववर पाहू शकता. तसेच लाईव्ह अपडेट्ससाठी आमची ही LINK तुम्ही पाहू शकता.

इतर बातम्या:

Tokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचा सेमीफायनलमध्ये पराभव, भारताचं सुवर्णपदकाचं स्वप्न तुटलं

Tokyo Olympics 2021: बॉक्सर लवलीनाचं पदक निश्चित, सेमीफायनलमध्ये टर्कीच्या बॉक्सरशी भिडणार

Tokyo Olympics 2021: भारताला मोठा झटका, मेरिकोमचा पराभव; ऑलम्पिकमधील दुसऱ्या पदकाच्या आशा संपल्या

(PV Sindhu will play match for bronze medal today 1st august at 5pm)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI