Tokyo Paralympics: सुवर्णपदक विजेत्या अवनीचा मिश्र सामन्यात नेम चुकला, उर्वरीत सामन्यात भारताला पदकाच्या आशा, आजचं वेळापत्रक एका क्लिकवर

भारताची आजची पॅरालिम्पिक्समधील सुरुवात नेमबाजांच्या पराभवाने झाली असली तरी दिवसभरातील बऱ्याच स्पर्धा अजून बाकी आहेत. त्यामुळे भारताला आज पदक मिळण्याच्या आशाही कायम आहे.

Tokyo Paralympics: सुवर्णपदक विजेत्या अवनीचा मिश्र सामन्यात नेम चुकला, उर्वरीत सामन्यात भारताला पदकाच्या आशा, आजचं वेळापत्रक एका क्लिकवर
अवनी लेखरा
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 10:53 AM

Tokyo Paralympics 2020: भारताची टोक्यो पॅरालिम्पिकमधील (Tokyo Paralympic 2020) आजच्या दिवसाची सुरुवात काहीशी निराशामय झाली आहे. भारताला महिला एकेरीत सुवर्णपदक मिळवून देणारी नेमबाज अवनी लेखरा (Avani Lekhara) 10 मीटर एअर रायफल मिश्र स्पर्धेत अपयशी ठरली. इतर नेमबाजही अयशस्वी ठरले असले तरी उर्वरीत दिवसांत सायंकाळपर्यंत भारताचे स्विमिंग, एथलेटिक्स, बॅडमिंटन असे विविध सामने आहेत.

आतापर्यंत भारताने स्पर्धेत दहा पदकं पटकावली आहेत. कालतर भारतीय खेळाडूंनी आता एकाच खेळात दोन पदकं खिशात घातली. उंच उडी स्पर्धेत दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावत भारताने रौप्य आणि कांस्य पदकावर नाव कोरलं आहे. यामध्ये मरियप्पन थंगावेलुने रौप्य (mariyappan thangavelu won silver) तर शरद कुमारने कांस्य (sharad kumar won Bronze) मिळवलं. त्याआधी दुपारच्या सुमारास नेमबाजीत सिंगराज अदानाने 10 मीटर एअर पिस्टल एसएच 1 मध्ये कांस्य पदक मिळवलं होतं. काल (मंगळवारी) भारताने दिवसभरात तीन पदकं मिळवली असून आज किती पदकं जिंकेल हे पाहावे लागेल. त्यासाठी आजचं उर्वरीत वेळापत्रक पाहा-

स्विमिंग – पुरुष 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक SB7 – अंतिम– सुयश जाधव -दुपारी 01:30 वाजता

बॅडमिंटन – मिश्र दुहेरी SL3 SU5 ग्रुप बी – सामना 1 – प्रमोद भगत आणि पलक कोहली – दुपारी 02:30 वाजता

एथलेटिक्स – पुरुष क्लब थ्रो – F51 – अंतिम – अमित कुमार सरोहा आणि धरमबीर – दुपारी 03:55 वाजता

बॅडमिंटन – महिला एकेराी SU5 ग्रुप ए – सामना 1 – पलक कोहली – सायंकाळी 05:10 वाजता

बॅडमिंटन – पुरुष एकेरी SL3 ग्रुप ए – सामना 1 – प्रमोद भगत विरुद्ध मनोज सरकार – सायंकाळी 05:50 वाजता

कुठे पाहू शकता पॅरालिम्पिक्सचे सामने?

पॅरालिम्पिक्स सामन्यांचे थेट प्रक्षेपण यूरो स्पोर्ट्स चॅनलवर होत आहे.तर भारताच्या स्पर्धा या चाहते दूरदर्शनवर पाहू शकतात.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहाल?

पॅरालिम्पिक्स खेळांची लाईव्ह स्ट्रीमिंग यूरो स्पोर्ट्सच्या मोबाईल अॅपवर पाहू शकता.

हे ही वाचा

Tokyo Paralympics 2020 मध्ये भारताच्या सिंगराजचं यश, नेमबाजीत पटकावलं कांस्य, भारताचं स्पर्धेतील आठवं पदक

Tokyo Paralympics मध्ये भारताची उंच उडी, एकाच स्पर्धेत रौप्य आणि कांस्य पदक भारताच्या पठ्ठ्यांना!

Tokyo Paralympics मध्ये भारताला मोठा झटका, विनोद कुमारला कांस्य पदक परत करण्याची वेळ

(Tokyo Paralympics Avni Lekhara lost in mixed event know todays team india schedule in paralympics on one click)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.