‘Indian Tigers & Indian Tigress’ भारतातील सर्वात मोठ्या फुटबॉल टॅलेंट हंटला सुरुवात

TV9 नेटवर्कचा इंग्रजी न्यूज ब्रँड News9 ने आज Indian Tigers & Indian Tigresses च्या लॉन्चिंगची घोषणा केली. हे भारतातील आतापर्यंतच सर्वात मोठ फुटबॉल टॅलेंट हंट आहे. यात अंडर 14 वयोगटातील फुटबॉलपटू कमाल दाखवतील.

‘Indian Tigers & Indian Tigress’ भारतातील सर्वात मोठ्या फुटबॉल टॅलेंट हंटला सुरुवात
‘Indian Tigers & Indian Tigress’
Follow us
| Updated on: Apr 10, 2024 | 3:36 PM

अंडर 14 वयोगटातील प्रतिभावान फुटबॉलपटूना शोधून काढण्याची आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम सुरु झाली आहे. ‘इंडियन टायगर आणि इंडियन टायग्रेसेस’ असं या मोहीमेच नाव आहे. तज्ज्ञांच्या मदतीने जागतिक स्तरावर भारताची फुटबॉलमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणं, हा या मोहिमेमागचा उद्देश आहे. अंगी फुटबॉल खेळण्याच कौशल्य असलेल्या मुला-मुलींना शोधून त्यांना योग्य प्रशिक्षण देणं, संधी देणं आणि व्यावसायिक फुटबॉलपटू बनण्यासाठी मार्ग उपलब्ध करुन देण हा या मोहिमेमागे उद्देश आहे. एका भव्य-दिव्य कार्यक्रमात आज या मोहिमेचा शुभारंभ झाला. देशातील नंबर-1 न्यूज नेटवर्क TV9 ची या उपक्रमात महत्त्वाची भूमिका असणार आहे. भारतातील अंडर-14 गटातील फुटबॉलपटूना यामुळे मोठी संधी मिळणार आहे. TV9 नेटवर्कचा इंग्रजी न्यूज ब्रँड News9 ‘Indian Tigers & Indian Tigresses’ हा उपक्रम आयोजित केलाय.

ग्रेटर नोएडा येथील दिल्लीच्या पब्लिक स्कूलमध्ये आज उद्घाटन झालं. जर्मनीतील अनेक नामवंत फुटबॉलपटू या कार्यक्रमात सहभागी झाले होते. TV9 नेटवर्कने प्रतिष्ठीत जर्मन संस्थेच्या मदतीने या ‘टॅलेंट हंट’ च आयोजन केलय. भारताच्या उदयोन्मुख फुटबॉलपटूंना यामुळे एक चांगलं व्यासपीठ मिळालं आहे. फुटबॉलमधील प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक मंच आहे.

‘हा उपक्रम आमच्यासाठी अभिमानास्पद बाब’

या टॅलेंट हंटमध्ये जर्मनीचे दिग्गज फुटबॉलपटू सुद्धा सहभागी होणार आहेत. TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ श्री बरुण दास यांनी या उपक्रमामागची संकल्पना समजावून सांगितली. “News9 चा Indian Tigers & Indian Tigresses हा उपक्रम आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. या मोहिमेमुळे भारतीय फुटबॉलला एक नवी दिशा मिळेल. भारतात फुटबॉल खेळणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. युवा फुटबॉलपटूना जागतिक स्तरावर ओळख मिळेल. छोट्या वयातच करिअरमध्ये त्यांना एक मोठी झेप घेता येईल. या उपक्रमामुळे खेळाडूंसाठी नवे दरवाजे उघडतील. त्यांची हजारो स्वप्न साकार होतील” असं TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ श्री बरुण दास म्हणाले.

कसा असेल टॅलेंट हंटचा कार्यक्रम?

टॅलेंट हंटचा हा कार्यक्रम एप्रिल ते जुलै पर्यंत चालणार आहे. देशभरातील 20 कोटीपेक्षा अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी टीवी9 नेटवर्कच्या प्लेटफॉर्मवर प्रसारण होईल. सोबतच TV9 डिजिटलवर सुद्धा प्रसारण होईल. इथे 100 मिलियनपेक्षा जास्त प्रेक्षक आहेत. यू ट्यूब चॅनलसह TV9 च्या अन्य भाषांच्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा प्रसारण होईल.

हे दिग्गज होणार सहभागी

या खास इवेंटमध्ये जर्मनीतील दिग्गज फुटबॉलपटू सहभागी होणार आहेत. जर्मन फुटबॉल असोसिएशनमध्ये (डीएफबी) आंतरराष्ट्रीय मीडिया प्रमुख काय डॅमहॉल्ज, बुंडसलीगामधून पीटर लायबल, रीस्पो (RIESPO) चे सीईओ गेरहार्ड रीडल, आशिया आणि युरोपमध्ये महिला फुटबॉलला नव्या उंचीवर घेऊन जाणारी जूलिया फार, जर्मनी आंतरराष्ट्रीय फुटबॉल संस्थेचे डॉ आंसेम कूच्ला, स्ट्रायकरलॅब्सचे सीईओ फिलिप क्लॉकल आणि वेलेंटीना पुत्ज सुद्धा या आयोजनात सहभागी होणार आहेत.

या फुटबॉलपटूना कुठल्या देशात पाठवणार?

जुलै आणि ऑगस्टमध्ये एक कठीण निवड प्रक्रिया होईल. 20 खेळाडू आणि 20 स्टँडबायची या मध्ये निवड करण्यात येईल. हे खेळाडू मैत्रीपूर्ण सामन्यात सहभागी होतील. या खेळाडूंना ऑस्ट्रिया आणि जर्मनीला पाठवण्यात येईल. त्यानंतर 17 ऑगस्ट 2024 रोजी जर्मनीच्या सुपरकप फायनलमध्ये 40 विजेत्या खेळाडूंचा सन्मान करण्यात येईल. भारताच्या या उदयोन्मुख Indian Tigers & Indian Tigresses ना युरोपच्या 65,000 प्रेक्षकांसमोर सन्मानित करण्यात येईल.

भारतीय फुटबॉलमध्ये एका नव्या युगाची सुरुवात

News9 Indian Tigers & Indian Tigresses चा हा कार्यक्रम देशभरातील युवा फुटबॉलपटूंसाठी आशा आणि संधीचा किरण आहे. ही भारतीय फुटबॉलमधील नव्या युगाची सुरुवात आहे. यामुळे पुढच्या पिढ्यांची हिम्मत आणि इरादे मजबूत होतील.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.