IND vs PAK: वैभव-अभिषेक पाकला लोळवण्यासाठी सज्ज, याच महिन्यात IND vs PAK आमने सामने, कधी, कुठे अन् किती वाजता?
IND vs PAK Match Where And When: भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा महामुकाबला रंगणार आहे. हा सामना कुठे, कधी आणि किती वाजता रंगणार आहे ते जाणून घ्या...

IND vs PAK Match: अंडर-१९ आशिया कप २०२६ चा अंतिम सामना रोमांचक ठरला, ज्यात भारताने पाकिस्तानला १ गडी राखून पराभूत केले. भारतीय पोरांनी पाकिस्तानच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला. आता, याच महिन्यात सुरू होणाऱ्या आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. तिलक वर्मा कर्णधार असेल आणि वैभव सूर्यवंशी व अभिषेक शर्मा हे देखील संघाचा भाग आहेत. सामना कधी आणि किती वाजता सुरू होईल ते जाणून घ्या.
आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ कधी सुरू होणार?
आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ ची सुरुवात १९ नोव्हेंबर रोजी होत असून, पहिला सामना बांगलादेश ‘अ’ संघाचा सामना हाँगकाँग आणि चीनशी होईल. भारत ‘अ’ संघाचा पहिला सामना २० नोव्हेंबर रोजी नेपाळविरुद्ध आहे. या स्पर्धेत एकूण आठ संघ खेळतील, ज्यांची प्रत्येकी चार संघांच्या दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. गट ‘अ’ मध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, हाँगकाँग, चीन आणि श्रीलंकेच्या ‘अ’ संघांचा समावेश आहे. गट ‘ब’ मध्ये भारत ‘अ’, नेपाळ, पाकिस्तान ‘अ’ आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांचा समावेश आहे.
भारत-पाकिस्तान सामना केव्हा, कुठे आणि किती वाजता आहे?
आशिया कप रायझिंग स्टार्समधील भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सामना रविवार, २२ नोव्हेंबर रोजी आहे. हा सामना दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. सामना दुपारी ३:३० वाजता सुरू होईल.
भारत अ संघ:
तिलक वर्मा (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, रिंकू सिंग, अभिषेक शर्मा, सूर्यांश शेडगे, आयुष बडोनी, शाहबाज अहमद, विपराज निगम, हर्ष दुबे, तनुष कोटियन, अर्शद खान, प्रभसिमरन सिंग, कुमार कुशाग्रा, हर्षित राणा, प्रिन्स यादव.
पाकिस्तान अ संघ
अब्दुल समद (कर्णधार), फरहान युसूफ, हैदर अली, हसन नवाज, शाहजेब खान, शमिल हुसैन, माझ सदाकत, साद मसूद, दानिश अझीझ, मोहम्मद इम्रान, रोहिल नजीर, अहिद दानियल, मोहम्मद हसनैन, सुफयान मोकीम, अली रझा.