6,6,6,6,6,6… शिवम मावीने 19 चेंडूत ठोकलं अर्धशतक, एका षटकात पाच षटकार

उत्तर प्रदेश टी20 लीग 2025 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात काशी रुद्रासच्या गोलंदाजाचा कहर पाहायला मिळाला. आठव्या स्थानावर फलंदाजीला उतरलेल्या मावीने अर्धशतक ठोकलं.

6,6,6,6,6,6… शिवम मावीने 19 चेंडूत ठोकलं अर्धशतक, एका षटकात पाच षटकार
6,6,6,6,6,6… शिवम मावीने 19 चेंडूत ठोकलं अर्धशतक, एका षटकात पाच षटकार
Image Credit source: UP T20 League Twitter
| Updated on: Aug 18, 2025 | 8:01 PM

उत्तर प्रदेश टी20 लीग स्पर्धेतील दुसऱ्याच सामन्यात आक्रमक खेळीचं दर्शन घडलं. हा सामना काशी रुद्रास आणि गोरखपूर लायंस यांच्यात पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल काशी रुद्रासच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजीसाठी उतरले. पण सुरुवात काही चांगली झाली नाही. धडाधड विकेट पडत होत्या आणि धावसंख्याही काही खास नव्हती. 14 षटकांत 7 गडी गमावून फक्त 89 धावा काढल्यानंतर संघ अडचणीत सापडला .पण आठव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या गोलंदाज शिवम मावीने कमाल केली. आक्रमक खेळी करत सामन्याचं चित्रच बदललं. इतकंच काय तर अर्धशतकही ठोकलं. अवघ्या 19 चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण केलं. त्याच्या आक्रमक खेळीमुळे काशी रुद्रास संघाला 20 षटकात 8 गडी गमवून 176 धावा करता आल्या.

शिवम मावीने 21 चेंडूत 54 धावांची आक्रमक खेळी केली. यात 6 षटकारांचा समावेश होता. त्याने 257.14 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. दुसऱ्या टोकाकडून शिवम मावीला शिवा सिंगचीही चांगली साथ मिळाली. आठव्या विकेटसाठी शिवम सिंगसोबत 87 धावांची भागीदारी केली .शिवाने 17 चेंडूंचा सामना करत 34 धावांची जलद खेळी केली आणि नाबाद राहिला.

18व्या षटकात तर कहर केल आणि एकाच षटकात पाच षटकार मारले. पहिल्या तीन चेंडूवर शिवाने सलग तीन षटकार मारले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली आणि शिवमला स्ट्राईक दिली. शिवमने शेवटच्या दोन चेंडूवर दोन षटकार मारले. या षटकात एकूण 31 धावा आल्या.गोरखपूर लायंसला या धावांचा पाठलाग काही करता आला नाही. गोरखपूर लायंस संघ 19.1 षटकात 126 धावांवर सर्वबाद झाला. हा सामना काशी रुद्रासने 50 धावांनी जिंकला. या सामन्यासाठी सामनावीराचा पुरस्कार शिवम मावीला मिळाला. त्याने 21 चेंडूत 54 धावा केल्या. तसेच 3.1 षटकात 24 धावा देत 3 गडी बाद केले. दुसरं इम्पॅक्ट प्लेयर बिहारी रायने गोलंदाजीत कहर केला. त्याने 4 षटकात 13 धावा देत 3 गडी बाद केले. तर कार्तिक यादवला 2 आणि सुनिल कुमारने 1 गडी बाद केला.