Vaibhav Sooryavanshi: जे कमवायला विराट, सचिनचं आयुष्य गेलं, ते वैभवला अगदी दोन ते तीन वर्षात सहज मिळालं
Vaibhav Sooryavanshi News: वैभव सूर्यवंशीला पाहण्यासाठी चाहते गर्दी करतील अशी अपेक्षा असल्याने तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने मोठा निर्णय घेतला.

Duleep Trophy Final: एम. ए. चिदंबरम स्टेडियमचे दरवाजे सगळ्या चाहत्यांसाठी खुले ठेवले होते. वैभव सूर्यवंशीला पाहण्यासाठी चाहते गर्दी करतील अशी अपेक्षा असल्याने तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने हा निर्णय घेतला. आतापर्यंत असे निर्णय केवळ विराट कोहली, सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंग धोनीसाठी घेतले गेल्याचे पाहायला मिळाले होते. दुलीप ट्रॉफीचा फायनल सामना सुरु आहे आणि हा सामना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी ही केली.
देशातंर्गत सामन्यासाठी असा क्रेझ याआधी जेव्हा विराट कोहली १२ वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून मैदानात उतरला. याआधी २०१३ मध्ये मुंबई आणि हरियाणा यांच्यात झालेल्या सामन्यात जिथे सचिन तेंडुलकरने आपला शेवटचा प्रथम-श्रेणी सामना खेळला होता तेव्हा असं दृश्य पाहायला मिळाले होते, त्यावेळी १५,००० चाहते जमले होते.
वैभव सूर्यवंशी अजून क्रिकेटच्या त्या शिखरावर पोहोचलेला नाही, जिथे सचिन आणि विराटसारख्या दिग्गजांनी दशकांपर्यंत राज्य केले आहे. पण आयपीएल २०२५ पासून वैभवची क्रेझ पाहायला मिळते. वैभवने २०२६मध्येही आयपीएल गाजवले होते. आता यामुळे वैभवचा मोठा फॅन बेस निर्माण झाला आहे. हाच चाहतावर्ग देशांतर्गत क्रिकेटमधील दुलीप ट्रॉफीच्या सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित होता. तब्बल 12,000 लोक वैभवची बॅटिंग पाहायला आलेले पाहायला मिळाले. इतक्या मोठा जमाव फक्त १५ वर्षीय खेळाडीला पाहण्यासाठी मैदानात पोहोचणं हे अतिशय आश्चर्यचकित करणारे आहे. वैभवने मात्र, चाहत्यांना निराश केले.
वैभव शतकी खेळी खेळेल अशी अपेक्षा होती, पण तसे काही घडले नाही. वैभवला आपले अर्धशतकही पूर्ण करता आले नाही. चाहते निराश झाले कारण वैभव जास्त काळ मैदानात टिकला नाही. वैभवला पाहायला आलेल्या चाहते नाराज दिसले पण त्यांना आनंदाचा झटकाही मिळाला, कारण इशान किशनने शतकी खेळी करुन चाहत्यांमध्ये आनंद पसरवला.
वैभव आता दुसऱ्या डावात कसा खेळतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे, वैभव जर तोडफोड खेळी खेळला तर त्याचा परिणाम हा निकालावर दिसणारच. दुलीप ट्रॉफीचा फायनल सामना आतो कोणता संघ जिंकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.