Vaibhav Sooryavanshi: सेमीफायनल मॅचमध्येच वैभव सूर्यवंशी फ्लॉप, कसा बाद झाला? पाहा Video

IND vs SL Asian Games 2026: भारत आणि श्रीलंका यांच्यात आशियाई क्रीडा स्पर्धेतील सेमीफायनल सामना सुरु आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशी संदी मिळाली पण त्याने सर्वांनाच निराश केले.

Vaibhav Sooryavanshi: सेमीफायनल मॅचमध्येच वैभव सूर्यवंशी फ्लॉप, कसा बाद झाला? पाहा Video
| Updated on: Oct 01, 2026 | 11:37 AM

IND vs SL Semifinal Asian Games 2026: भारत विरुद्ध श्रीलंका आशियाई खेळ २०२६ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने नाणेफेक गमावली, श्रीलंकाने भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्यास सांगण्यात आले. अंतिम ११ खेळाडूंची घोषणा होताच भारतीय चाहते आनंदित झाले. वैभव सूर्यवंशीचे संघात पुनरागमन झाले आहे. पण हा आनंद जास्त काल टीकला नाही.

वैभव सूर्यवंशीला श्रीलंकेविरुद्ध अर्धशतकी झळकावता आले नाही. तो केवळ ३८ धावा करुन बाद झाला. भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन पाहून चाहतेही आनंदी झाले. कारण संजू सॅमसन आणि वैभव सूर्यवंशी या दोघांनाही संधी मिळाली. पण वैभवने चाहत्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले. वैभव श्रीलंकेची लंका पेटवेल अशी अपेक्षा होती पण तसं काहीच झाले नाही.

Loading...

जपानविरुद्धच्या भारतीय संघात दोन बदल दिसून येतात. भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून अर्शदीप सिंगला वगळले आहे. मात्र, भारतीय संघासाठी आनंदाची बातमी ही आहे की जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन झाले आहे. तो प्लेइंग इलेव्हनमध्ये यश ठाकूरच्या जागी खेळणार आहे. जपानविरुद्धच्या एकमेव टी-२० सामन्यात बुमराहला विश्रांती देण्यात आली होती.

भारत (प्लेइंग इलेव्हन): वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), ईशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह

जर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने उपांत्य फेरीत श्रीलंकेला हरवले, तर २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांचे स्थान निश्चित होईल. यामुळे भारताला किमान रौप्य पदक तरी मिळेल. चाहत्यांना अंतिम सामन्यात भारत-पाकिस्तान सामनाही पाहायला मिळेल. पाकिस्तानने पहिल्या उपांत्य फेरीत बांगलादेशला हरवून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.  जर भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला तर फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री मारेल. जिथे भारताचा संघ पाकिस्तानशी सामना खेळेल. जर तोही सामना भारत जिंकला तर सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळेल. भारतीय महिलांनी सुवर्णपदक जिंकले आहे आता पुरुष क्रिकेट संघाकडे पूर्ण लक्ष असणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us