Vaibhav Sooryavanshi: मॅचपूर्वी वैभवने शेअर केली पोस्ट, कॅप्शनची चर्चा, थेट टोमणा मारला?
Vaibhav Sooryavanshi Post: वैभव सूर्यवंशीने एक पोस्ट शेअर केली आहे, उद्या भारत आणि वेस्ट इंडिजचा चौथा टी-२० सामना रंगणार आहे, या सामन्यापूर्वी वैभवने केलेल्या पोस्टची चर्चा होत आहे.

Vaibhav Sooryavanshi Post: वैभव सूर्यवंशीचे पदार्पण हे झाले आहे, परंतु तो अद्याप भारतात एकही सामना खेळलेला नाही. वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत त्याला स्थान मिळेक अशी आशा होती, पण तीन सामन्यात त्याला काही संधी मिळालेली नाही. आता चौथा टी-२० सामना उद्या रंगणार आहे. या सामन्यापूर्वी आता वैभव सूर्यवंशीने एक पोस्ट शेअर करत टोमणा मारला आहे.
बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या चौथ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघ मैदानात उतरेल. वैभव सूर्यवंशीने एक पोस्ट शेअर केली ज्याची आता जोरदार चर्चा सुरु आहे. वैभवने केलेल्या पोस्टमधून हे स्पष्ट समजत आहे की तो टोमणा मारत आहे. तीन सामने त्याला बाहेर बसून ठेवल्यानंतर त्याने ही पोस्ट केल्यामुळे त्याने टोमणा मारला असावा ही शक्यता नाकारताही येत नाही. त्याने सराव करतानाचे फोटो शेअर केले असून त्याने त्यावर “Stay Seated” अशी कॅप्शन दिली आहे. या असा कॅप्शनमुळे त्याने टोमणा मारला असल्याती शक्यता वर्तवली जात आहे.
वैभव सूर्यवंशीने इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. संजू सॅमसनला वगळून त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले. तीन सामन्यांतील त्याच्या खराब कामगिरीनंतर त्याला वगळण्यात आले आणि संजू सॅमसनला पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले. यानंतर, भारतीय संघाने झिम्बाब्वेचा दौरा केला, जिथे सॅमसन संघाचा भाग नव्हता. वैभव तिन्ही सामने खेळला आणि त्याला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. यानंतर, भारताने यजमान म्हणून अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिका खेळली.
वैभवला कोणत्याही सामन्यात संधी मिळाली नाही. त्यानंतर भारतीय संघ जपानला गेला, जिथे तो एकमेव टी-२० सामना खेळू शकला नाही, परंतु तो २०२६ च्या आशियाई खेळांच्या उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यात खेळला. सॅमसनही संघात होता. दरम्यान, जेव्हा भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिका खेळण्यासाठी मायदेशी परतला, तेव्हा वैभव सूर्यवंशीला वगळण्यात आले. संजू सॅमसनने तीन सामन्यांमध्ये डावाची सुरुवात केली. तो दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरला आणि एका सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले. त्यामुळे, सॅमसनच्या जागी वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा आहे.