AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेला धुतल्याचं फळ मिळालं, वैभवला थेट आयसीसीकडून मिळाली गुड न्यूज

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात नुकतीच मालिका पार पडली. जी भारतीय संघाने जिंकली. या मालिकेत विशेष लक्ष हे वैभव सूर्यवंशीवर होते. कारण मागील दोन मालिकेत त्याला विशेष कामगिरी करता आलेली नव्हती. वैभवने झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत दमदार कमबॅक केला. 

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेला धुतल्याचं फळ मिळालं, वैभवला थेट आयसीसीकडून मिळाली गुड न्यूज
| Updated on: Jul 29, 2026 | 3:14 PM
Share
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात नुकतीच मालिका पार पडली. जी भारतीय संघाने जिंकली. या मालिकेत विशेष लक्ष हे वैभव सूर्यवंशीवर होते. कारण मागील दोन मालिकेत त्याला विशेष कामगिरी करता आलेली नव्हती. वैभवने झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत दमदार कमबॅक केला.  वैभवने या मालिकेत एकूण 151 धावा केल्या.  हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध भारताने नुकत्याच जिंकलेल्या 3-0 मालिका सामन्यादरम्यान, सूर्यवंशीने 50.33 च्या सरासरीने 151 धावा केल्या आणि आपला पहिला ‘मालिकावीर’ पुरस्कार पटकावला. वैभवचे यानंतर सर्वत्र कौतुक झाले. आता वैभवचा याला मोठा फायदा झाला आहे. वैभवला आता आयसीसीकडून मोठी गुड न्यूज मिळाली आहे.

15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयसीसीच्या पुरुष टी20 आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत लक्षणीय झेप घेतली आहे.  त्याच्या प्रभावी कामगिरीचा परिणाम बुधवारी आयसीसीने अद्ययावत केलेल्या साप्ताहिक क्रमवारीत स्पष्टपणे दिसून आला. वैभवने एकूण 230 स्थानांची झेप घेतली असून, टी२० आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत 48 व्या स्थानावर पोहोचून आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवले आहे. त्याचा संघसहकारी इशान किशन या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.

झिम्बाब्वेमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यानंतर, किशननेही आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवले. या डावखुऱ्या फलंदाजाने शानदार 81 धावा केल्या आणि 916 गुण मिळवले, जे आतापर्यंतचे तिसरे सर्वोत्तम फलंदाजी रेटिंग आहे. केवळ त्याचा संघसहकारी अभिषेक शर्मा (931 रेटिंग गुण) आणि इंग्लंडचा डेव्हिड मलान (919) हेच त्याच्या पुढे आहेत. मालिकेच्या अखेरीस किशनचे रेटिंग 910 गुणांपर्यंत घसरले, परंतु तो दुसऱ्या क्रमांकावरील साहिबजादा फरहान (848) पेक्षा खूप पुढे आहे.

आता भारतीय संघ थेट ऑगस्ट महिन्यात मैदानात उतरणार आहे. यावेळी ते श्रीलंकाविरुद्ध खेळतील. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात वैभव खेळताना दिसणार नाही. कारण श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामने असणार आहेत. श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. पहिला सामना हा 15 ऑगस्ट 2026 रोजी खेळवला जाईल. दुसरा कसोटी हा सामना 23 ऑगस्ट 2026 रोजी खेळवला जाणार आहे. आता या कसोटी सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहेत.

Follow Us
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?