AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशियाई स्पर्धेत भारताला मोठा धक्का, MMA फायटर वरुण अचानक बेशुद्ध; पदकाचं स्वप्न धुळीस; नेमकं काय घडलं?

भारतीय एमएमए फायटर वरुण सन्याल हा आशियाई खेळांमधील 77 किलो वजनी गटासाठी वजन कमी करण्याच्या प्रक्रियेदरम्यान सौना मध्ये बेशुद्ध झाला. वैद्यकीय तपासणीनंतर, आयओए आणि त्याच्या प्रशिक्षकाच्या सल्ल्यानुसार, त्याला वैद्यकीय कारणास्तव स्पर्धेतून वगळण्यात आले.

आशियाई स्पर्धेत भारताला मोठा धक्का, MMA फायटर वरुण अचानक बेशुद्ध; पदकाचं स्वप्न धुळीस; नेमकं काय घडलं?
Varun Sanyal, Asian Games 2026 MMA FighterImage Credit source: social media
| Updated on: Sep 20, 2026 | 3:38 PM
Share

जपानमध्ये आयोजित विसाव्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला मोठा झटका बसलाय. पुरुषांच्या ७७ किलो वजनी गटामधील एमएमए या प्रकारात भारताचा दावेदार वरुण सन्याल हा वजन करण्याच्या ऐन प्रक्रियेदरम्यान वैद्यकीय कारणामुळे अपात्र ठरला आहे. त्यामुळे तो आता स्पर्धेतून बाहर झाला आहे. त्यामुळे भारताच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान यंदा पहिल्यांदाच भारत या प्रकारामध्ये समाविष्ट झालेला. भारताच्या संघातली दुसरी एमएमए फायटर सुचिका तारियाल हीने महिलांच्या 60 किलो वजनी गटामध्ये उपांत्य फेरी गाठून भारताचे पदक निश्चित केले आहे.

नेमकं काय घडलं?

दरम्यान, वजन कमी करण्याच्या कठोर प्रक्रियेदरम्यान सन्यालला डिहायड्रेशन आणि स्नायूंमध्ये तणाव आला. 77 किलो वजनी गटाची मर्यादा गाठण्यासाठी द्रवपदार्थ आणि अन्नाचे सेवन मर्यादित करण्याव्यतिरिक्त वरुण सौना बाथही घेत होता. सौनामध्ये 30 मिनिटे घालवल्यानंतर त्याला चक्कर येत होती. त्याला डोकेदुखीही सुरु झाली. त्यातच त्याला झटकाही येऊ लागला, यासगळ्यात तो बेशुद्ध झाला.

त्यानंतर त्याच्या सहकारी खेळाडूंनी आणि एमएमएचे टीमचे अध्यक्ष निखिल कुंदर यांनी रुग्णालयात नेले. त्याचवेळी त्याची विचारपूस केली. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला स्पर्धेसाठी अयोग्य असल्याचे घोषित केले. यासगळ्याप्रकारामुळे वरुणला मोठा धक्का बसला आहे. त्याची मानसिकतेवर परिणाम झाला. जपानमध्ये पोहोचल्यापासूनच त्याला क्रूजवर राहण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागलेला.

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर भारताच्या ऑलम्पिक संघाकडून एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. वरुण सन्यालने त्याच्या क्रूझवरील निवासस्थानातील सौनामध्ये असताना संपूर्ण शरीरात तणाव आणि वेदना होत असल्याची तक्रार केली. त्याची वैद्यकीय तपासणी आणि खबरदारी म्हणून रक्तचाचण्या करण्यात आल्या, ज्यांचे अहवाल सामान्य आले. पण, विश्रांती घेऊनही, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला खेळांमध्ये भाग घेण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त वाटले नाही. आपल्या प्रशिक्षकाशी सल्लामसलत केल्यानंतर, त्याने वैद्यकीय कारणास्तव माघार घेतली आहे.”

दरम्यान, वरुण सन्याल हा भारताची टॉप लेव्हल मिक्स मार्शल आर्ट्स फायटर आहे. वरुण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य असलेले संजीव सन्याल आणि स्मिता बरुआ यांचा मुलगा आहे. सन्याल कुटुंब हे भारतीय स्वतंत्र लढ्यातही सहभागी झालेले आहे.

Follow Us
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...