Vijay Hazare Trophy | लिपिकाच्या मुलाचा क्रिकेटच्या मैदानात झंझावात, 25 चेंडूत चोपल्या 106 धावा, अवघ्या 8 धावांसाठी हुकलं द्विशतक

| Updated on: Mar 08, 2021 | 6:02 PM

विजय हजारे स्पर्धेत (vijay hazare trophy 2021) केरळ विरुद्धच्या क्वार्टर फायनल सामन्यात (Karnataka vs Kerala) रवीकुमार समर्थने (Ravikumar Samarth) 192 धावांची खेळी केली.

Vijay Hazare Trophy | लिपिकाच्या मुलाचा क्रिकेटच्या मैदानात झंझावात, 25 चेंडूत चोपल्या 106 धावा, अवघ्या 8 धावांसाठी हुकलं द्विशतक
excerpt : विजय हजारे स्पर्धेत (vijay hazare trophy 2021) केरळ विरुद्धच्या क्वार्टर फायनल सामन्यात (Karnataka vs Kerala) रवीकुमार समर्थने (Ravikumar Samarth) 192 धावांची खेळी केली.
Follow us on

दिल्ली : देशांतर्गत सुरु असलेलेल्या विजय हजारे स्पर्धेत (Vijay Hazare Trophy 2021) अनेक युवा खेळाडू आपली छाप सोडत आहेत. यंदाच्या स्पर्धेत फलंदाजांनी आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. फलंदाज आपल्या कामगिरीने दिग्गजांच लक्ष वेधून घेत आहेत. आज (8 March) केरळ विरुद्ध झालेल्या सामन्यात कर्नाटकचा कर्णधार रवीकुमार समर्थने (Ravikumar samrath) वादळी खेळी केली. रवीकुमारचे वडील एसबीआय (SBI) बँकेत क्लर्क म्हणून काम करतात. केरळ विरुद्ध कर्नाटक यांच्यातील (Karnataka vs Kerala Quarter Final 2) क्वार्टर फायनल 2 मधील सामन्यात रवी कुमारने 25 चेंडूत 106 धावा चोपल्या. (vijay hazare trophy 2021 Karnataka Ravikumar Samarth score 192 runs against kerala)

त्याने एकूण 156 चेंडूत 192 धावा केल्या. यामध्ये त्याने 22 चौकार आणि 3 षटकार खेचले. म्हणजेच रवीकुमारने 25 चेंडूत फोर आणि सिक्सच्या मदतीने 106 धावा केल्या. पण द्विशतकाबाबत रवीकुमार दुर्देवी ठरला. त्याचे शतक अवघ्या 8 धावांनी हुकले. दरम्यान त्याच्या या खेळीच्या जोरावर कर्नाटकाने 50 षटकात 3 विकेट्स गमावून 338 धावांपर्यंत मजल मारली.

शानदार सुरुवात

केरळने नाणेफेक जिंकून कर्नाटकाला बॅटिंगसाठी भाग पाडले. कर्नाटकाने या निर्णयाचा फायदा उचलला. सलामीवीर रवीने स्टार बॅट्समन देवदत्त पडीक्कलसोबत सुरुवात केली. या दोघांनी शानदार सुरुवात केली. दोघांनी तब्बल 249 धावांची सलामी भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान देवदत्त आणि रवीकुमार या दोघांनी वैयक्तिक शतकं पूर्ण केली. 249 धावांवर कर्नाटकाला पहिला धक्का बसला. देवदत्त 101 धावावंर बाद झाला.

यानंतर मनिष पांडे मैदानात आला. पांडेच्या सोबतीने रवीने आपला झंझावात सुरुच ठेवला. त्याने केरळाच्या फलंदाजांना चांगलाच चोपला. मैदानातील सर्व दिशेने त्याने फटके मारले. तो द्विशतकाच्या उंबरठ्यावर होता. तो द्विशतक पूर्ण करेल, असं सर्वांनाच वाटत होतं. पण समर्थ दुर्देवाने 192 धावांवर बाद झाला. अवघ्या 8 धावांनी त्यांच द्विशतक हुकलं. पण त्याच्या या खेळीमुळे कर्नाटकने 338 धावांपर्यंत मजल मारली.

स्पर्धेत 600 धावा करणारा दुसरा फलंदाज

रवीकुमार या सुरु असलेल्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाारा दुसरा फलंदाज ठरला आहे. समर्थने आतापर्यंत 6 सामन्यात 3 शतक आणि 2 अर्धशतकांसह 605 धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावांचा विक्रम कर्नाटकाच्या देवदत्त पडीक्कलच्या नावावर आहे.

संबंधित बातम्या :

Vijay Hazare Trophy 2021 | 20 वर्षीय युवा फलंदाजाचा तडाखा, सलग 4 वनडे शतकं ठोकली, संगकाराच्या विक्रमाशी बरोबरी 

(vijay hazare trophy 2021 Karnataka Ravikumar Samarth score 192 runs against kerala)