AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinod Kambli Birthday : संघर्ष करणाऱ्या कांबळीसाठी आजचा दिवस खास, बर्थ डे च्या दिवशीच केलं कधीही न विसरता येणारं काम

Vinod Kambli Birthday : विनोद कांबळी आज 18 जानेवारीला 53 वर्षांचा झाला. सध्या विनोद कांबळीचा संघर्ष सुरु आहे. विनोद कांबळीची आजची स्थिती पाहून अनेकजण हळहळ व्यक्त करतायत. विनोदच्या करिअरची सुरुवात जितकी दमदार झाली, शेवट तितकाच वाईट झाला. विनोदने त्याच्या बर्थ डे च्या दिवशीच कधीही न विसरता येण्यासारख एक काम केलं होतं.

Vinod Kambli Birthday : संघर्ष करणाऱ्या कांबळीसाठी आजचा दिवस खास, बर्थ डे च्या दिवशीच केलं कधीही न विसरता येणारं काम
Vinod Kambli Image Credit source: PTI
| Updated on: Jan 18, 2025 | 8:18 AM
Share

विनोद कांबळीसाठी आजचा दिवस खूप खास आहे. कारण आजच्याच दिवशी त्याचा जन्म झाला होता. 1972 चा जन्म असलेला विनोद कांबळी आज 53 वर्षांचा झाला आहे. विनोद कांबळीसाठी ही तारीख काही दुसऱ्या कारणांमुळे सुद्धा खास आहे. 18 जानेवारीलाच विनोद कांबळीने अशी काही कमाल केली होती की, तो कधी विसरणार नाही. विनोद कांबळीने 18 जानेवारीलाच वाढदिवशी करिअरमधील पहिलं शतक झळकावलं होतं. त्यावर्षी कांबळीचा 21 वा वाढदिवस होता. जयपूरमध्ये इंग्लंड विरुद्ध तो शतकीय इनिंग खेळला होता.

18 जानेवारी 1993 रोजी विनोद कांबळी ही धमाकेदार इनिंग खेळला होता. आपल्या वाढदिवशी विनोद कांबळी तिसऱ्या नंबरवर फलंदाजीसाठी उतरला होता. टीम इंडियाची खराब सुरुवात झाली. नवज्योतसिंह सिद्धू दुसऱ्याच चेंडूवर आऊट झाला. त्यानंतर कांबळीने विकेटवर येऊन टीम इंडियाचा डाव सावरला. जयपूरची विकेट फलंदाजीसाठी कठीण होती. म्हणून कांबळीने क्रीजवर पाय रोवून फलंदाजी केली.

सचिनने त्या मॅचमध्ये किती धावा केलेल्या?

त्याने बालमित्र सचिन तेंडुलकरसोबत मिळून टीम इंडियाची धावसंख्या 223 पर्यंत पोहोचवली. कांबळीने 202 मिनिट फलंदाजी केली. त्याने 149 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. त्याने 9 चौकार आणि एक षटकार लगावला. सचिनने 81 चेंडूत 82 धावा केल्या. त्याने सहा फोर आणि एक सिक्स मारला. भारताचा या सामन्यात पराभव झाला होता. इंग्लंडने चार विकेट राखून 223 धावांच लक्ष्य पार केलं होतं.

शेवट तितकाच वाईट

विनोद कांबळीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटची धमाकेदार सुरुवात केली होती. सचिनने कांबळीच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पण सचिनच्या दीड वर्ष आधी कांबळीने आपलं पहिलं वनडे शतक झळकावलं होतं. कांबळीने आपल्या पहिल्या चार कसोटी सामन्यातच दोन द्विशतकं झळकावली होती. त्याने पुढच्या दोन टेस्ट मॅचमध्ये सुद्धा आणखी दोन शतकं झळकावली. कांबळीने जितकी दमदार त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात केली होती, शेवट तितकाच वाईट झाला. कांबळीने टीम इंडियाकडून खेळताना 17 टेस्ट मॅचमध्ये 54.20 च्या सरासरीने 1084 धावा केल्या. कांबळी 104 वनडे सामने खेळला. त्यात त्याने 32.59 च्या सरासरीने 2477 धावा केल्या.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.