विराटच्या सुपरफास्ट 20 हजार धावा, सचिन-लाराचा विक्रम मोडला

| Updated on: Jun 27, 2019 | 7:04 PM

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी विश्वचषक सामन्यात एक नवा इतिहास रचला आहे. सध्या वेस्ट इंडीज विरुद्ध सुरु असलेल्या विराटने माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडीज क्रिकेटर ब्रायन लाराचा विक्रम मोडीत काढला आहे.

विराटच्या सुपरफास्ट  20 हजार धावा, सचिन-लाराचा विक्रम मोडला
Follow us on

लंडन : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी विश्वचषक सामन्यात नवा इतिहास रचला आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात विराटने 20 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 20 हजार धावांचा विक्रम विराटच्या नावे जमा झाला आहे.

विराटने एकाचवेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लाराचा विक्रम मोडीत काढला आहे. सर्वात वेगवान आणि कमी वेळेत 20 हजार धावा करणारा विराट एकमेव खेळाडू ठरला. विराटने 417 व्या डावात हा विक्रम केला. तेंडुलकर आणि ब्रायन लारा या दोघांनीही 453 डावात 20 हजार धावांचा टप्पा गाठला होता.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या आजच्या सामन्यात विराट 82 चेंडूत 72 धावा करुन बाद झाला. 20 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी विराटला आज केवळ 37 धावांची गरज होती.

20 हजार धावांपर्यंत पोहोचणारा विराट तिसरा भारतीय आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी 20 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. तर जगभरातील खेळाडूंमध्ये हा पराक्रम करणारा विराट 7 वा खेळाडू ठरला.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने 468 डावाता 20 हजार धावा पूर्ण केल्या.

सलग चौथ्यांदा 50 पेक्षा अधिक धावा

आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यात कोहलीने 232 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 11 हजारपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. कोहलीने सध्या सुरु असलेल्या विश्वचषक सामन्यात सलग चौथ्यांदा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. विश्वकपमध्ये सलग चार वेळा 50 पेक्षा अधिक धावा करणारा विराट तिसरा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी ग्रॅमी स्मिथ (2007) आणि अॅरोन फिंच (2019) यांनी ही कामगिरी केली आहे.

सर्वात कमी डावात  20 हजार धावा करणारे फलंदाज

  • विराट कोहली 417 डाव
  • सचिन/लारा 453 डाव
  • रिकी पॉन्टिंग 464 डाव
  • एबी डिव्हिलियर्स 483 डाव
  • जॅक कॅलिस 491 डाव
  • राहुल द्रविड 492 डाव