IND vs ENG: एकच हृदय किती वेळा जिंकणार विराट भाऊ? किंगने प्रिन्ससाठी जे केलं ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान; Video Viral

भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना भारतीय संघाने जिंकला. सामना जिंकल्यानंतर विराट कोहलीने शुभमन गिलसाठी जे केले त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

IND vs ENG: एकच हृदय किती वेळा जिंकणार विराट भाऊ? किंगने प्रिन्ससाठी जे केलं ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान; Video Viral
virat kohli shubman gill
| Updated on: Jul 15, 2026 | 10:43 AM

इंग्लंडविरुद्ध टी-20 सामन्यात 4-0 असा मानहानिकारक पराभव झाल्यानंतर, भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत दमदार सुरुवात केली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना बर्मिंगहॅममधील एजबास्टन येथे खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना 6 गडी राखून जिंकत 1-0 अशी आघाडी घेतली. भारतीय गोलंदाज आणि फलंदाज या दोन्ही विभागाने दमदार काम केली. सामना संपल्यावर खेळाडू हस्तांदोलन करण्यासाठी मैदानावर आले. आता याच दरम्यान विराट कोहलीने एक गोष्ट केली ज्याची आता सर्वत्र चर्चा होत आहे. विराटचं फक्त नाव मोठं नाही तर त्याचे मनही विराट आहे या वृत्तीवरुन समजते. विराटच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या सामन्यादरम्यान, विराट कोहलीने कर्णधार शुभमन गिलसाठी एक अशी कृती केली, ज्यामुळे चाहते भारावून गेले आहेत. खरे तर, सामना संपल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू डगआऊटमधून बाहेर आले आणि इंग्लंडच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यासाठी पुढे गेले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, विराट कोहली पुढे चालत होता, तेव्हा किंग कोहली अचानक थांबला आणि त्याने गिलला जवळ येण्याचा इशारा केला. सामना संपल्यानंतर संघाचा कर्णधार विरोधी संघाशी हस्तांदोलन करण्यासाठी पुढे चालतो आणि विराट कोहलीला याची पूर्ण कल्पना होती. व्हायरल व्हिडिओमध्ये विराटच पुढे चालत होता, पण नंतर तो थांबला गिल पुढे येईपर्यंत त्याने एकही पाऊल पुढे टाकले नाही. नंतर गिल पुढे आला. या कृतीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

याच कारणामुळे विराट कोहलीने आधी गिलला पुढे आणले, मग तो त्याच्या मागे गेला आणि त्या इंग्लंडच्या खेळाडूशी हस्तांदोलन केले. विराट कोहलीच्या या कृतीने सोशल मीडियावर कौतुक होत आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या शुभमन गिलने 80 धावांची दमदार खेळी करून विजयाचा पाया रचला. गिलला दुखापत होत असल्याने तो रिटायर्ड बाद झाला. नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी करतना 258 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. विराट कोहली आणि रोहित शर्मा स्वस्तात बाद झाले. कर्णधार शुभमन गिलने एकट्याने किल्ला लढवला, पण तो जखमी झाला आणि दुखापतग्रस्त होऊन निवृत्त झाला. यानंतर, वॉशिंग्टन सुंदरने 63 चेंडूंमध्ये नाबाद 52 धावा आणि अक्षर पटेलने 52 चेंडूंमध्ये नाबाद 57 धावा करून भारतीय संघाला मालिकेच्या सलामीच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवून दिला.

Follow Us