AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: अरेरे आता काय भारत हरणार…पण एका क्षणात गेम पलटला, एक ओव्हर टर्निंग पॉइंट ठरली अन् टीम इंडिया सहज जिंकली

भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना काल रंगला. आता या सामन्यात एक निर्णयामुळे खरं तर भारतीय संघाचे नुकसान व्हायला हवे होते पण नेमका फायदा झाला. तो फायदा कसा झाला ते पाहा...

IND vs ENG: अरेरे आता काय भारत हरणार...पण एका क्षणात गेम पलटला, एक ओव्हर टर्निंग पॉइंट ठरली अन् टीम इंडिया सहज जिंकली
gurnoor brar injury
| Updated on: Jul 15, 2026 | 10:04 AM
Share

एजबॅस्टन येथे टीम इंडियाच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार आणि अक्षर पटेल यांनी अचूक गोलंदाजी करत इंग्लंडला 50 षटकेही खेळू दिली नाहीत आणि त्यांना 47.5 षटकांत 258 धावांवर रोखले. एका क्षणी इंग्लंडने केवळ 107 धावांत सहा गडी गमावले होते, पण लियाम डॉसन आणि जो रूट यांनी शानदार शतकी भागीदारी करून संघाला 250 धावांच्या पुढे नेले. टीम इंडियाच्या गोलंदाजीदरम्यान 48 व्या षटकात एक रंजक घटना घडली. हे षटक गुरनूर ब्रार टाकणार होता, पण धावताना त्याला दुखापत झाली आणि ही दुखापत टीम इंडियासाठी नुकसानकारक ठरण्याऐवजी फायदेशीर ठरली पण कशी ते जाणून घ्या…

गुरनूर ब्रारच्या दुखापतीचा टीम इंडियाला खऱ्या अर्थाने फायदा झाला. गुरनूर ब्रारच्या दुखापतीनंतर कर्णधार शुभमन गिलने ते षटक अक्षर पटेलकडे सोपवले. डावखुऱ्या गोलंदाजाने आपल्या षटकात राशीद अली आणि जोश टंग यांना बाद केले, ज्यामुळे जो रूट खेळपट्टीवर उभा राहिला. जर इंग्लंडने पन्नास षटके खेळली असती, तर त्यांची धावसंख्या अधिक असू शकली असती. गुरनूर ब्रारच्या दुखापतीमुळे अक्षर पटेलने इंग्लंडमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी केली. या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने 62 धावांत 4 बळी घेत एडजबॅस्टन येथील सर्वोत्तम कामगिरी करणारा भारतीय फिरकी गोलंदाज बनण्याचा मान मिळवला. अक्षर पटेलने लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि जोश टंग यांचे बळी घेतले.

भारतीय गोलंदाजांची कामगिरी कशी होती?

भारतीय गोलंदाजांनी एडजबॅस्टनच्या खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी केली. जसप्रीत बुमराहने 31 धावांत 1 बळी घेतला. प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. अक्षर पटेलने सर्वाधिक 4 बळी घेतले. शिवम दुबेनेही एक बळी घेतला.

भारतीय फलंदाजीपैकी कर्णधार शुभमन गिल 80 धावा करुन रिटायर्ड बाद झाला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने नाबाद 52 अक्षर पटेलने नाबाद 57 धावा केल्या. रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडून चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या पण तसं काही घडले नाही. रोहित शर्मा 11, विराट कोहली 5 धावा करुन बाद झाले.

Follow Us
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; राऊतांना...
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; बड्या नेत्याचा राऊतांना इशारा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी, पहा खास क्षणाचा व्हिडीओ
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात...नेमकं प्रकरण काय?
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात... नेमकं प्रकरण काय?
परभणीत एकनाथ शिंदे यांचा भव्य शेतकरी मेळावा; महाराष्ट्राच्या राजकारणात
परभणीत एकनाथ शिंदे यांचा भव्य शेतकरी मेळावा; महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं ठरणार
वैजापुरातील पानटपरीवर एफडीएची कारवाई, मुदत बाह्य पदार्थ जप्त
छत्रपती संभाजीनगर: वैजापुरातील पानटपरीवर एफडीएची कारवाई, मुदत बाह्य पदार्थ जप्त
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; विद्यार्थ्यांचा...
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; आदिवासी विद्यार्थ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द,
मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द, अचानक काय घडलं?
45 लाख गाड्या, 5 टप्प्यात 6 कोटी मराठे... मनोज जरांगेंनी सांगितलं...
45 लाख गाड्या, 5 टप्प्यात 6 कोटी मराठे... मनोज जरांगेंनी सांगितला मोठा प्लॅन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल, फडणवीसांनी केलं स्वागत
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्वागत