T20 World Cup आधी कोहलीने बदलली हेअरस्टाईल, विराटचा नवा लूक पाहिला का?

शनिवारी हेअर स्टायलिस्ट रशीद सलमानीने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला.

T20 World Cup आधी कोहलीने बदलली हेअरस्टाईल, विराटचा नवा लूक पाहिला का?
virat kohli new look
Image Credit source: twitter
महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Sep 19, 2022 | 10:44 AM

T20 World Cup सुरु होण्यापुर्वी टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) प्रसिध्दीच्या झोतात आला आहे. आशिया चषकात (Asia Cup) त्याने चांगली कामगिरी केल्यापासून सोशल मीडियावर (Social Media) त्याची अधिक चर्चा आहे. कारण पुढील महिन्यात होणाऱ्या T20 World मध्ये त्यांच्याकडून चांगली कामगिरी होण्याची शक्यता आहे. विराट फॉर्ममध्ये आल्याने टीममध्ये सुद्धा आनंदाचं वातावरणं आहे.

आशिया चषकात भारतीय खेळाडूंनी महत्त्वाच्या सामन्यात खराब कामगिरी केल्यामुळे पराभव झाला. त्यामुळे खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवरती चाहते निराश झाले आहेत.

जगातल्या प्रत्येक खेळाडूची एक स्टाईल आहे. तसेच प्रत्येक खेळाडू त्यांच्या अनोख्या स्टाईल आणि शैलीमुळे ओळखला जातो. सध्या होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत अनेक खेळाडूंची स्टाईल चर्चेची ठरणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरोधात भारत तीन साखरी सामने खेळणार आहे. त्या आगोदर विराट कोहलीने आपली हेअर स्टाईल चेंज केली आहे. चाहत्यांमध्ये नव्या हेअरस्टाईलची अधिक चर्चा आहे.

शनिवारी हेअर स्टायलिस्ट रशीद सलमानीने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला. विशेष म्हणजे त्या व्हिडीओमध्ये तो विराट कोहलीसोबत दिसत आहे. व्हिडीओला त्याने विराट कोहलीचा नवा लुक असा आशय लिहिला आहे. तो व्हिडीओ चाहत्यांच्या अधिक पसंतीला पडला आहे.

हे सुद्धा वाचा

T20 विश्वचषक 2022 साठी टीम इंडीया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें