Virat Kohli : विराट कोहलीच्या व्हायरल झालेल्या एका फोटोवरुन मोठी खळबळ, चर्चांना उधाण

Virat Kohli : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीचा एक फोटो व्हायरल झालाय. त्यावरुन मोठी खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आलं आहे. हा फोटो पाहून फॅन्सही हैराण आहेत. असं काय आहे त्या फोटोमध्ये?.

Virat Kohli : विराट कोहलीच्या व्हायरल झालेल्या एका फोटोवरुन मोठी खळबळ, चर्चांना उधाण
Virat Kohli
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 08, 2025 | 1:56 PM

भारतीय क्रिकेट टीमचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन केलय. त्याची जगभरात मोठी फॅन फॉलोइंग आहे. अलीकडेच विराट कोहलीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा फोटो पाहून फॅन्सही हैराण आहेत. सर्वांच्या मनात आता एक प्रश्न निर्माण होतोय की, विराट कोहली वनडे क्रिकेटमधूनही रिटायर होणार का?. विराट कोहलीचा हा फोटो लंडनचा आहे. शाश पटेल सोबत त्याने हा फोटो काढलाय.
विराट कोहलीने सध्या फक्त वनडे क्रिकेटचा भाग आहे.

या फोटोमध्ये विराट कोहलीची दाढी सफेद रंगात दिसतेय. त्यावर लोकांनी कमेंट केली आहे. विराट कोहलीचं सध्याच वय 36 वर्ष आहे. फॅन्सच्या मनात प्रश्न निर्माण होतोय की, विराट कोहली आता वनडे क्रिकेटमधूनही निवृत्ती घेणार का?. इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेआधी विराट कोहलीने टेस्ट फॉर्मेटमधून निवृत्ती स्वीकारली. इतकचं नाही, तर आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 संपल्यानंतर टी 20 फॉर्मेटमधूनही निवृत्ती जाहीर केली होती. विराट कोहलीने सध्या फक्त वनडे क्रिकेटचा भाग आहे.

विधानाने सोशल मीडियावर खळबळ

10 जुलै रोजी युवराज सिंगने एक इवेंट होस्ट केलेला. त्यात विराट कोहली सुद्धा दिसलेला. त्या कार्यक्रमात विराटने आपल्या दाढीवरुन एक स्टेटमेंट केलेलं. कोहली म्हणालेला की, “मी आत्ताच दोन दिवसांपूर्वी माझी दाढी कलर केली. आता दर चार दिवसांनी दाढी रंगवण्याची वेळ आलीय” त्याच्या या विधानाने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. सर्वच असं म्हणतायत की, मस्करीत केलेल्या या वक्तव्यामागच सत्य तो लपवतोय.


ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीज कधी?

टीम इंडियाकडून विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीज खेळताना दिसू शकतो. टीम इंडियाकडून तो अखेरचा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तीन वनडे आणि पाच टी 20 सामने खेळणार आहे. 19 ऑक्टोंबरपासून ही सीरीज सुरु होईल. या वनडे सीरीजमध्ये चाहत्यांना विराटकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.