IND vs ENG 1st T20 | के एल राहुल की शिखर धवन, हिटमॅन रोहित शर्मासोबत ओपनिंगला कोण उतरणार? विराटने दिलं उत्तर

| Updated on: Mar 11, 2021 | 8:30 PM

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात (india vs england t 20 series) 12 मार्चपासून टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे.

IND vs ENG 1st T20 | के एल राहुल की शिखर धवन, हिटमॅन रोहित शर्मासोबत ओपनिंगला कोण उतरणार? विराटने दिलं उत्तर
Follow us on

अहमदाबाद : टीम इंडिया कसोटी मालिकेत इंग्लंडला चितपट केल्यानंतर आता टी 20 मालिकेसाठी (India vs Engalnd 1st T 20) सज्ज झाली आहे. येत्या 12 मार्चला या टी 20 मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत ओपनिंगला ‘हिटमॅन’ रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबत के एल राहुल (K L Rahul)) की शिखर धवन (Shikhar Dhawan)उतरणार यावरुन विविध तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) यावर स्पष्टीकरुन देऊन सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. येत्या टी 20 मालिकेत रोहित शर्मासोबत के एल राहुल ओपनिंगला उतरणार असल्याचं विराट कोहलीने सांगितलं आहे (Virat Kohli said K L rahul and Rohit Sharma will first choice opening pair for t20 series against england).

धवन सध्या बॅकओपनरच्या भूमिकेत

के एल राहुल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. याशिवाय ओपनिंगला उतरुन राहुलने चांगली कामगिरी केली आहे. दुसरीकडे शिखर धवनने देखील विजय हजारे ट्रॉफीत शतक लगावलं होतं. तरीही टी 20 वर्ल्ड कपचा विचार करुन टीम मॅनेजमेंटने धवनच्या ऐवजी के एल राहुलला संधी देण्याचा विचार केला असेल. तर धवन सध्या बॅकओपनरच्या भूमिकेत दिसेल. “धवन टीम इंडियाचे बॅक ओपनर असतील”, असं विराटने स्पष्ट केलंय. त्यामुळे रोहित किंवा राहुल दुखापतग्रस्त झाले तर धवनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल (Virat Kohli said K L rahul and Rohit Sharma will first choice opening pair for t20 series against england).

विराट नेमकं काय म्हणाला?

“रोहित शर्मा आणि राहुलने लगातार चांगल प्रदर्शन केलं आहे. या सीरीजसाठी आमची पहिली जोडी रोहित आणि राहुल असेल. विशेष म्हणजे यावेळी टीम इंडियाचे तिनही ओपनिंग बॅट्समन फिट आहेत. त्यामुळे ते सिलेक्शनसाठी उपलब्ध आहेत. रोहित शर्मा ओपनर आहेच, पण राहुलने न्युझीलंड विरोधात पाच सामन्यांच्या टी 20 सीरीजमध्ये 224 धावा केल्या होत्या. तर ऑस्ट्रेलिया विरोधातील तीन टी 20 सामन्यांमध्ये 81 धावा केल्या होत्या”, असं विराट कोहली म्हणाला.

भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन

दरम्यान, ओपनिंग प्लेअरबाबत माहिती दिल्यानंतर विराटने गोलंदाजांची माहिती दिली. येत्या टी 20 सीरीजमध्ये भुवनेश्वर कुमारची वापसी होणार आहे. यावर कोहलीने आनंद व्यक्त केला. “भुवनेश्वरच्या टीममधील वापसीने आनंदी आहे. भुवनेश्वरदेखील चांगलं प्रदर्शन करण्यासाठी सज्ज असेस”, असं कोहली म्हणाला. दरम्यान, येत्या सीरीजमध्ये भुवनेश्वर याच्यासोबत दीपक चहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर आणि टी नटराज हे देखील गोलंदाज असतील.

वेगवान गोलंदाजी

वेगवान गोलंदाजीची जबाबदारी शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहर या तिघांवर असेल. शार्दुल ठाकूर आणि दीपक चाहर चांगली कामगिरी करत आहेत. तर भुवनेश्वर दुखापतीतून सावरलेला आहे. यामुळे भुवी पुनरागमनासाठी सज्ज आहे.

इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.

अशी आहे इंग्लंड टीम : इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलींग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिंग्विनस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिस टोपेल आणि मार्क वुड.

संबंधित बातमी : India vs Engalnd 1st T 20 | कसोटीनंतर रंगणार टी 20 चा थरार, पहिल्या सामन्यात कोणाला संधी, कोणाला डच्चू?