
Virat Kohli Retirement : विराट कोहली हा भारताचा स्टार क्रिकेटपटू आहे. तो मैदानावर आला की चाहते त्याच्या नावाचा जयघोष करतात. विशेष म्हणजे तो फलंदाजाली बॅट घेऊन आला की मैदानावर धावांचा पाऊस पडतो. बडोद्यात न्यूझिलंडविरोधात झालेल्या सामन्यात त्याची पुन्हा एकदा प्रचिती आली. त्याने तब्बल 93 धावा केल्या. विराटच्या दमदार खेळीमुळेच भारताला विजयी पताका फडकवता आली. दरम्यान, विराट कोहली सध्या एकदीवसीय सामन्यांत खेळताना दिसतो. हाच मुद्दा उपस्थित करत विराटबद्दल एका बड्या खेळाडूने मोठे विधान केले आहे. विराट कोहलीने निवृत्ती घ्यायला नको होती, असे मत या खेळाडूने व्यक्त केले आहे.
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय कसोटी तसेच टी-20 खेळप्रकारातून निवृत्ती घेतलेली आहे. सध्या तो फक्त एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसतो. दक्षिण आफ्रिकेचे प्रसिद्ध माजी गोलंदाज अॅलन डोनाल्ड यांनी विराट कोहलीच्या निवृत्तीच्या निर्णयावर भाष्य केले आहे. विराटने कसोटी क्रिकेटमधून खूप लवकर निवृत्ती घेतली, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. सोबतच विरोट कोहलीची 2027 सालाच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक खेळण्याची त्याची भूक कायम आहे, असेही डोनाल्ड म्हणाले आहेत.
डोनाल्ड यांनी याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या आयपीएलमध्ये खेळणाऱ्या संघाच्या गोलंदाजी विभागाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. याच काळात डोनाल्ड आणि विराट एकमेकांच्या संपर्कात आले. डोनाल्ड यांनी विराट कोहलीचा खेळ त्याआधीही पाहिलेला आहे. विराट कोहलीमध्ये क्रिकेट खेळण्याची भूक अन्य कोणत्याही खेळाडूत नाही. ड्रेसिंग रुममध्ये मी त्याला नेहमी चॅम्पियन म्हणायचो. मला तो मशीन असल्यासारखेच वाटचे, असे मत डोनाल्ड यांनी व्यक्त केले आहे.
तसेच विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय खूपच लवकर घेतला. मला त्याची कसोटी क्रिकेटमध्ये फार उणीव भासते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेऊन सर्वात मोठी चूक केली ना? अशी भावना व्यक्त केली जात आहे.