waqar younis: पाकिस्तानच्या पराभवानंतर वकार युनूस संतापला, म्हणाला “माहित नाही अंपायर…”

पाकिस्तानचा फलंदाज साउद शकील याचा कॅच वादात सापडला आहे.

waqar younis: पाकिस्तानच्या पराभवानंतर वकार युनूस संतापला, म्हणाला माहित नाही अंपायर...
waqar yonoos
Image Credit source: twitter
| Updated on: Dec 13, 2022 | 12:20 PM

मुंबई : इंग्लंड टीम (ENG) सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे त्या टीमची सगळीकडे तारिफ केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. इंग्लंडच्या टीमने पाकिस्तानच्या (PAK) टीमचा कसोटी सामन्यात पराभव केल्यानंतर पाकिस्तान टीमच्या माजी कर्णधाराला अधिक वाईट वाटलं असल्याचं स्पष्ट झालं आहे. पाकिस्तानच्या माजी कर्णधाराच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे वकार युनूसने (waqar younis) अंपायरला थेट टार्गेट केलं आहे.

इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यातील पाकिस्तानचा फलंदाज साउद शकील याचा कॅच वादात सापडला आहे. इंग्लंडचा गोलंदाज मार्क वुडच्या गोलंदाजीवरती ओली पोपने त्याचा कॅच पकडला होता. त्यानंतर मैदानात असलेल्या अंपायरकडे अपील करण्यात आली होती. थर्ड अंपायरने रिप्लाय पाहिल्यानंतर आऊट देण्यात आलं.

कसोटी सामन्यात पाकिस्तानचा 26 धावांनी पराभव केला. विशेष म्हणजे शकील 94 धावा करुन बाद झाला आहे. इंग्लंडच्या टीमने घेतलेला झेल मॅचचा टर्निंग पॉइंट मानला जात आहे. वकार युनूस याने ज्या व्हिडीओचा आधार घेऊन थर्ड अंपायरने निर्णय घेतला. त्याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यामध्ये लिहिलं आहे की, अंपायरला चेंडूखाली कोणते बोट दिसले. ज्यावेळी चेंडू जमिनीला स्पर्श झाला त्यावेळी त्याच्याखाली कुठे बोटे दिसत आहेत असा प्रश्न केला आहे.