AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरच्या वडिलांनी घर सोडलं

BCCI ने कडक सूचना दिल्या आहेत की, जर कोणत्याही खेळाडूला कोरोनाचा संसर्ग झाला तर त्याने इंग्लंड दौर्‍याबाहेर जाण्याचा विचार करावा.

भारताचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरच्या वडिलांनी घर सोडलं
Washington Sundar and his father M. Sunder
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: | Updated on: Oct 20, 2022 | 1:35 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौर्‍यावर (India tour of England) रवाना होईल. या दौर्‍यावर टीम इंडिया 18 जूनपासून न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम लढत (2019–21 ICC Test Championship Final) लढणार आहे. यानंतर विराट कोहली आणि कंपनी यजमान इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. (Washington Sundar’s father M Sunder decided to stay in different house since son’s IPL return)

बीसीसीआयने (BCCI) कडक सूचना दिल्या आहेत की, जर कोणत्याही खेळाडूला कोरोनाचा संसर्ग झाला तर त्याने इंग्लंड दौर्‍याबाहेर जाण्याचा विचार करावा. हे लक्षात घेऊन अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरचे (Washington Sundar) वडील एम सुंदर (M Sundar) यांनी आपल्या मुलाला या धोकादायक विषाणूपासून वाचविण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.

कुटुंबासोबत केवळ ऑनलाईन संवाद

वॉशिंग्टनच्या वडिलांनी 19 मे पर्यंत मुलापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडला जाणारे सर्व खेळाडू 19 तारखेला मुंबईत जमणार आहेत. भारतीय अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरचे वडील एम. सुंदर हे चेन्नईमधील प्राप्तिकर विभागात (इनकमटॅक्स डिपार्टमेंट) प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आठवड्यातून तीन दिवस ऑफिसला जावे लागते.

चेन्नईमध्ये कोरोना व्हायरसची (Coronavirus) प्रकरणे वाढत आहेत. अशा परिस्थितीत एम. सुंदर यांनी असा निर्णय घेतला आहे की, ते त्यांच्या मुलासोबत एकाच घरात राहणार नाहीत. वॉशिंग्टनचे वडील आता दुसर्‍या घरात राहत आहेत आणि आपल्या कुटुंबाशी अधून-मधून ऑनलाईन संवाद साधत आहेत.

कुटुंबाच्या काळजीपोटी दुसऱ्या घरात राहण्याचा निर्णय

एम. सुंदर यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, जेव्हापासून वॉशिंग्टन आयपीएल खेळून आला आहे, तेव्हापासून मी एका वेगळ्या घरात राहत आहे. माझी पत्नी आणि मुलगी वॉशिंग्टनसोबत राहत आहेत. तो घरी आल्यापासून त्या दोघींनी घर सोडलेलं नाही. मी त्यांना फक्त व्हिडिओ कॉलद्वारे पाहतो. मला आठवड्यातून काही दिवस ऑफिसला जायचे आहे. माझ्यामुळे आमच्या घरातील कुणालाही कोरोना संसर्ग होऊ नये, असं मला वाटतं. त्यामुळेच मी माझ्या कुटुबियांपासून दूर राहतोय.

टीम इंडियाचा इंग्लंड दौरा

जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, 18 ते 23 जून, साउथ्मपटन

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

  • पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट
  • दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट
  • तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट
  • चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर
  • पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

अशी आहे टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव,

संबंधित बातम्या :

ICC World Test Championship Final | आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 फायनल आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

(Washington Sundar’s father M Sunder decided to stay in different house since son’s IPL return)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...