कसलाच माज नाही, स्टार क्रिकेटपटूने चक्क रस्त्यावर स्वत:च्या हाताने दिलं जेवण, Video Viral

भारतीय संघाने नुकतेच सुवर्णपदक जिंकले. सुवर्णपदक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूने जे केलं आता त्यामुळे त्याचे खूप कौतुक होत आहे..

कसलाच माज नाही, स्टार क्रिकेटपटूने चक्क रस्त्यावर स्वत:च्या हाताने दिलं जेवण, Video Viral
| Updated on: Oct 06, 2026 | 11:10 AM

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा १९ धावांनी पराभव केला. पुरुष क्रिकेट संघाने सुवर्णपदक पटकावले, तर पाकिस्तानला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. आता गोल्ड मेडल जिंकणाऱ्या भारतीय संघात वॉशिंग्टन सुंदरचाही समावेश होता. आता सुवर्णपदक जिंकल्यानंतरही सुंदरला कसलाच माज नसल्याचे दाखवून दिले. सुंदरचा वाढदिवस त्याने ज्या पद्धतीने साजरा केला त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वॉशिंग्टनचा सुंदर स्वभाव

Loading...

वॉशिंग्टन सुंदरचा काल वाढदिवस होता. सुंदरने अतिशय साधेपणाने आपला वाढदिवस साजरा केला. आता सुंदरचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तो रस्त्यावर चक्क सामन्य माणसाप्रमाणे उभं राहून लोकांना प्रसाद आणि जेवण देत आहे. व्हायरल व्हिडिओवर लोकांनी कमेंट करत त्याचे फार कौतुक केले आहे.

मॅचबद्दल सांगायचे झाले तर, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत २११ धावा केल्या. अभिषेक शर्माने ६८ धावा केल्या आणि तिलक वर्मानेही ५१ धावांची वादळी खेळी केली. पाकिस्तानकडून हसन नवाझ शेवटच्या षटकापर्यंत लढला, पण त्याच्या ९६ धावांच्या खेळीचा पाकिस्तानला काही उपयोग झाला नाही.

२१२ धावांचे लक्ष्य गाठताना पाकिस्तानने अवघ्या ३९ धावांत तीन गडी गमावले. त्यानंतर हसन नवाझ आणि सॅम अयुब यांनी ८७ धावांची भागीदारी करून भारतीय संघाचा आणि त्यांच्या चाहत्यांचा उत्साह वाढवला. अयुब आणि हसन खेळपट्टीवर असताना भारताचा पराभव निश्चित वाटत होता. १५ व्या षटकात शिवम दुबेने सॅम अयुबला बाद करून भारतीय संघाला पुनरागमन करण्याची संधी दिली. येथूनच पाकिस्तानच्या पडझडीला सुरुवात झाली. मात्र, हसन नवाझने शेवटच्या षटकापर्यंत खेळपट्टीवर टिकून राहत ९६ धावा केल्या.

भारताचे १९ वे सुवर्णपदक

यापूर्वी, भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेला हरवून सुवर्णपदक जिंकले होते. पुरुष संघानेही पाकिस्तानला १९ धावांनी हरवून शानदार कामगिरी केली आहे. क्रिकेटमधील दोन्ही सुवर्णपदके पुन्हा एकदा भारताला मिळाली आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे भारताचे १९ वे सुवर्णपदक आणि एकूण ८१ वे पदक आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us