Video: पाकडे सुधारणार नाहीत, भारताने हरवल्यानंतर खेळाडूची नीच कृती

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी खेळाडूने जे कृत्य केले आहे ते पाहून नेटकरी संतापले आहेत.

Video: पाकडे सुधारणार नाहीत, भारताने हरवल्यानंतर खेळाडूची नीच कृती
Pakistani Player
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 29, 2025 | 12:08 PM

भारताने नुकतेच अंडर-16 टेनिस टूर्नामेंट ज्युनियर डेव्हिस कपमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेत भारताच्या विरुद्ध पाकिस्तान असा सामना होता. भारतीय खेळाडूने प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 2-0 अशा फरकाने हरवले. कझाकस्तानच्या श्यामकेंट येथे खेळताना भारतीय खेळाडू प्रकाश सरन आणि तविश पहवा यांनी सुपर टाय-ब्रेकमध्ये आपला एकेरी सामना जिंकला. त्यामुळे भारताचे अंतिम सामन्यात स्थान निश्चित झाले. पण आता या सामन्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. खरंतर, व्हायरल क्लिपमध्ये भारताकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू भारतीय खेळाडूसोबत हात मिळवताना गैरवर्तन करताना दिसत आहे.

भारतीय खेळाडूचा हात झटकला

सामना संपल्यानंतर खेळाचा आदर करत भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूशी हात मिळवण्यासाठी गेला होता. पण पाकिस्तानी खेळाडूने आक्रमक इशारा केला आणि सुरुवातीला हात मिळवण्यास नकार दिला. तो पुन्हा परत आला, पण त्याने हात मिळवताना अचानक भारतीय खेळाडूचा हात अपमानजनक पद्धतीने झटकला. आता त्याच्या या कृतीवर खूप टीका होत आहे. दुसरीकडे, चाहत्यांनी भारतीय खेळाडूच्या शांत वर्तन, संयम आणि खेळाची प्रतिष्ठा राखल्याबद्दल कौतुक केले.

मात्र, भारताने पाकिस्तानला हरवले असले तरी 9-12 प्लेऑफमध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्यांना 1-2 अशा पराभवाचा सामना करावा लागला. तिथे भारतीय जोडी दुहेरी सामन्यात सुपर टाय-ब्रेकमध्ये (9-11) पराभूत झाली.

पहलगाम हल्ल्यानंतर तणाव

22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये 26 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले होते. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. याच काळात दोन्ही देशांतील क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटींमध्ये सोशल मीडियावर वादविवाद सुरू झाले होते. जरी आता युद्धबंदी झाली असली, तरी तणाव अजूनही दिसून येत आहे.