SpecialStory | #IndiavsEngland2021 | आत्मविश्वासाने भरलेल्या टीम इंडियाचं इंग्लंडविरोधात काय होणार?

| Updated on: Jan 24, 2021 | 9:37 AM

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात कसोटी, टी 20 आणि वनडे मालिका खेळण्यात येणार आहे.

SpecialStory | #IndiavsEngland2021 | आत्मविश्वासाने भरलेल्या टीम इंडियाचं इंग्लंडविरोधात काय होणार?
टीम इंडिया
Follow us on

मुंबई : ऑस्ट्रेलियाला नमवल्यानंतर टीम इंडिया इंग्लंडविरोधात (England Tour India 2021) खेळण्यासाठी सज्ज आहे. इंग्लंडच्या भारत दौऱ्याला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळण्यात येणार आहे. 4 टेस्ट, 5 ट्वेन्टी-20 आणि 3 वनडे मॅच, असा हा भरगच्च कार्यक्रम असणार आहे. एकूण 52 दिवसांचा इंग्लंडचा भारत दौरा असणार आहे. इंग्लंडच्या या भारत दौऱ्याची कसोटी मालिकेपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाने अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत कसोटी मालिकेत कांगारुंचा त्यांच्यात भूमित पराभव केला. तसेच त्याआधी टी 20 मालिकेतही विजय मिळवला. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. (what will happen to the confident team india against england )

टीम इंडियाची कसोटी मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी घोषणा करण्यात आली. यामध्ये नियमित कर्णधार विराट कोहली, इशांत शर्मा, हार्दिक पंड्या आणि केएल राहुलचं पुनरागमन झालं आहे. तसेच सोबतीला ऑस्ट्रेलियाविरोधात दमदार कामगिरी केलेले नव्या दमाचे शिलेदारही आहेत. त्यामुळे भारताला बळकटी मिळाली आहे. मात्र दुर्देवाने रवींद्र जाडेजाच्या बोटाला झालेल्या फ्रॅक्चरमुळे त्याला कसोटी मालिकेला मुकावे लागले. तर मोहम्मद शमीचीही दुखापतीमुळे पहिल्या 2 कसोटीसाठी निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे शमीची दुखापत भारतासाठी चिंतेचा विषय आहे. कसोटी मालिकेतील पहिले 2 सामने हे चेन्नई तर उर्वरित 2 सामने हे अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये खेळण्यात येणार आहेत.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना-चेन्नई-5-9 फेब्रुवारी
दूसरा सामना – चेन्नई-13ते17 फेब्रुवारी
तिसरा सामना-अहमदाबाद- 24 ते 28 फेब्रुवारी
चौथा सामना-अहमदाबाद-4 ते 8 मार्च

टेस्ट सीरिजनंतर उभय संघांमध्ये 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळली जाणार आहे. टीम इंडियाचा टी 20 मध्ये चांगला रेकॉर्ड आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर त्यांच्याच भूमित टी 20 मालिकेत विजय मिळवला. हा टीम इंडियाचा सलग 5 वा टी 20 मालिका विजय ठरला. तसेच टीम इंडियाने सलग 10 टी 20 सामने जिंकले आहेत. त्यामुळे या टी 20 मालिकेत इंग्लंडचा पराभव करुन विजयी षटकार मारण्याच्या हेतूने टीम इंडिया मैदानात उतरेल. हे सामने 1 दिवसाच्या अंतराने खेळवण्यात येणार आहे. हे पाचही सामने अहमदाबादमध्ये खेळवले जाणार आहेत.

टी 20 मालिका

पहिला सामना – 12 मार्च
दुसरा सामना – 14 मार्च
तिसरा सामना – 16 मार्च
चौथा सामना – 18 मार्च
पाचवा सामना – 20 मार्च

इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सांगता एकदिवसीय मालिकेने होणार आहे. या वनडे सीरिजमध्ये 3 मॅच खेळल्या जाणार आहेत. या 3 सामन्यांचे आयोजन पुण्यात करण्यात आलं आहे. भारताला एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाविरोधात 2-1 ने पराभव स्वीकारावा लागला. यामुळे इंग्लंडविरोधात विजय मिळवून वनडे सीरिजची नववर्षातील विजयी सुरुवात करण्याचा मानस टीम इंडियाचा असणार आहे. त्यामुळे टीम इंडिया इंग्लंडविरोधात कशी कामगिरी करते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

एकदिवसीय मालिका

पहिली मॅच – 23 मार्च
दूसरी मॅच – 26 मार्च
तिसरी मॅच – 28 मार्च

संबंधित बातम्या :

England Tour India | इंग्लंडच्या भारत दौऱ्याची घोषणा, ‘या’ 3 स्टेडियमध्ये खेळण्यात येणार सामने

England Tour India | टीम इंडिया इंग्लंडविरोधातील कसोटी मालिका 3-1 ने जिंकणार, ब्रॅड हॉगची भविष्यवाणी

England Tour India | इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, अजिंक्य रहाणे की विराट कोहली, कर्णधार कोण?

(what will happen to the confident team india against england )