
Smriti Mandhana And Palash Muchhal : भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना जिंकून जेतेपद पटकावले आहे. या विजयानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची देशभरात वाहवा होत आहे. भारताला अंतिम सामन्यापर्यंत घेऊन जाण्यात स्टार महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिचे मोठे योगदान आहे. भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर आता स्मृती मंधानासोबतच तिच्या बॉयफ्रेंडचीही सगळीकडे चर्चा चालू आहे. तिचा बॉयफ्रेंड कोण आहे? त्याची संपत्ती किती आहे? सोबतच हे दोघे कधीपासून रिलेशनमध्ये आहेत? असेही विचारले जात आहे.
समृती मंधानाच्या बॉयफ्रेंडचे नाव पलाश मुच्छल असे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. अलिकडेच त्यांनी त्यांचे नाते सार्वजनिक केलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2019 सालापासून ते नात्यात आहेत. जुलै 2024 मध्ये आम्ही एकमेकांच्या प्रेमात आहोत असे स्मृती तसेच पलाश यांनी त्यांच्या चाहत्यांना सांगितले होते.
ऑक्टोबर 2025 मंध्ये इंदौरमध्ये एक खासगी पार्टी झाली होती. या पार्टीमध्ये पलाशने स्मृतीसोबत लवकरच लग्न करणार असल्याचे संकेत दिले होते. पलाश मुच्छल एक प्रसिद्ध संगीतकार, गायक, चित्रपट निर्माता आहे. त्याने काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केलेले आहे. संगीताची मोठी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात पलाश मुच्छलचा जन्म झालेला आहे. पलाशने भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेले आहे. सोबतच तो देश-विदेशात चॅरिटी शो करतो. पार्टी तो बनती है, तू ही है आशिकी या गाण्यांसाठी पलाशला ओळखले जाते. तू जो कहे, निशा आणि फॅन्स नही फ्रेण्ड्स यासारखे म्युझिक व्हिडीओंचीही त्याने निर्मिती केलेली आहे. अभिनेता म्हणूनही खेलें हम जी जान या चित्रपटात काम केलेले आहे. अर्ध यासारख्या चित्रपटांचे त्याने दिग्दर्शनही केलेले आहे.
बॉलिवुड शादीच या संकेतस्थळानुसार पलाशची एकूण संपत्ती 30 ते 40 कोटी रुपये आहे. पलाशचा जन्म 22 मे 1995 रोजी झालेला आहे. तो मुळचा मध्य प्रदेशातील इंदौर येथील रहिवासी आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने विजय मिळवताच त्याने स्मृती मंधानासोबतचे काही फोटो शेअर केले होते. सोबतच त्याने भारताची विजयी ट्रॉफी हातात घेऊन भारतीय संघाचे अभिनंदन केले होते.